पाकिस्तान क्रिकेट संघाचा विश्वचषक 2023 स्पर्धेतील प्रवास खूपच खराब राहिला. त्यांना उपांत्य फेरीत जागा मिळवता न आल्याने ते स्पर्धेबाहेर फेकले गेले. बाबर आझम याच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघावर त्यामुळे टीका होत आहे. असे असतानाच, आता बाबर आझम याने मोठा निर्णय घेतला असून त्याने सर्व प्रकारांमधून आपल्या नेतृत्वाचा राजीनामा दिला सोशल मीडिया पोस्ट करत त्याने त्याबाबत माहिती दिली. नेतृत्वाचा राजीनामा दिला असला तरी, खेळाडू म्हणून तो खेळत राहणार आहे.
— Babar Azam (@babarazam258) November 15, 2023
पाकिस्तान संघ विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर बोर्डाने संपूर्ण निवड समितीच बरखास्त केली होती. त्याच्या जागी माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याला नवीन निवड समिती अध्यक्ष बनवले गेले आहे. त्यामुळे कर्णधार पदावरून काढून टाकण्याआधीच बाबरने राजीनामा दिला. यामध्ये त्याने बोर्डाचे आभार मानले. त्याने लिहिले,
“देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आभार मानतो. मागील चार वर्षात आम्ही अनेक अविस्मरणीय क्षण पाहिले. मात्र आता मी या पदावरून बाजूला होत आहे. कोणत्याच प्रकारात मी आता कर्णधार नसेल. मात्र, एक खेळाडू म्हणून मी माझे योगदान देत राहील.”
विश्वचषकात सहभागी होताना क्रमांक दोनचा संघ म्हणून सहभागी झालेल्या पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश करता आला नाही. खेळाच्या तिन्ही विभागात पाकिस्तानने अत्यंत सुमार खेळ केला. आशिया चषकापाठोपाठ विश्वचषकाच्या बाद फेरीत पोहोचू न शकल्याने पाकिस्तान क्रिकेटमध्ये आता आणखी महत्त्वाचे बदल होताना दिसण्याची शक्यता आहे.
(BABAR AZAM HAS STEPPED DOWN AS PAKISTAN’S CAPTAIN FROM ALL FORMATS)
महत्वाच्या बातम्या –
World Cup Semi Final: वानखेडेवर लागली सेलिब्रिटींची रांग! बेकहॅमपासून बॉलीवूड स्टेडियममध्ये
एक घाव, दोन तुकडे! वर्ल्डकपमध्ये जगात कुणालाच न जमलेला विक्रम रोहितच्या नावे, प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान