आयसीसी वनडे विश्वचषक 2023 मध्ये शुक्रवारी (27 ऑक्टोबर) पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघ आमने सामने आले. पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानने सुरुवातीच्या विकेट्स झटपट गमावल्या. पण कर्णधार बाबर आझम खेळपट्टीवर टिकून राहिला आणि अर्धशतक केले.
बाबर आझम () वनडे विश्वचषक 2023 मध्ये पहिल्या पाच पैकी दोन सामन्यात अर्धशतकी खेळी करू शकला होता. त्याने शुक्रवारी (27 ऑक्टोबर) विश्वचषकातील तिसरे अर्धशतक केले. याआधी त्याने विश्वचषकाच्या चालू हंगामात भारत आणि अफगाणिस्तानविरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती. भारताविरुद्धच्या सामन्यात 50, तर अफगाणिस्तानविरुद्ध 74 धावांची खेळी केली होती. शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 65 चेंडूत50 धावा केल्यानंतर बाबारने विकेट गमावली. विश्वचषकापूर्वी धावा करण्यासाठी झगडणारा बाबर विश्वचषक सुरू झाल्यानंतर मात्र पुन्हा फॉर्ममध्ये परतताना दिसत आहे. मागच्या सहा पैकी तीन सामन्यांमध्ये त्याने अर्धशतक केले आहे.
(Babar Azam scored half-centuries in three out of six World Cup matches)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
पाकिस्तान – अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, शादाब खान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम ज्युनिअर, हरिस रौफ
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, जेराल्ड कोएट्झी, केशव महाराज, तबरेझ शम्सी, लुंगी एन्गिडी
महत्वाच्या बातम्या –
भारतीय खेळाडूंनी सराव सत्रात दाखवला दम; प्रमुख फलंदाजांनीही केली गोलंदाजी,पाहा व्हिडीओ
‘एकटा कर्णधार विश्वचषक जिंकू शकला असता, तर…’, गंभीरचा पुन्हा एकदा धोनीवर निशाणा, पण सोशल मीडियावर ट्रोल