श्रीलंका संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेत पुन्हा लय गमावली. सुरुवातीच्या सलग तीन सामन्यात पराभव पत्करल्यानंतर त्यांनी पुढील दोन्ही सामने जिंकले होते. मात्र, सोमवारी (दि. 30 ऑक्टोबर) पुण्यात झालेल्या स्पर्धेच्या 30व्या सामन्यात त्यांना अफगाणिस्तानकडून 7 विकेट्सने पराभूत व्हावे लागेल. हा त्यांचा स्पर्धेतील चौथा पराभव ठरला. या सामन्यात त्यांच्या गोलंदाज आणि फलंदाजांना चांगले प्रदर्शन करता आले नाही. या पराभवासह श्रीलंकेच्या नावावर खराब विक्रमाची नोंद झाली.
या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी (Hashmatullah Shahidi) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरला. यावेळी श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानला 242 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान अफगाणिस्तानने 45.2 षटकात 3 विकेट्स गमावत पार केले.
श्रीलंकेचा खराब विक्रम
अफगाणिस्तानकडून सामना गमावताच श्रीलंका वनडे विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक सामने गमावणारा संघ बनला. श्रीलंकेने वनडे विश्वचषकात आतापर्यंत तब्बल 43 सामने गमावले आहेत. यापूर्वी हा खराब विक्रम झिम्बाब्वेच्या नावावर होता. झिम्बाब्वे संघाने वनडे विश्वचषकात 42 सामने गमावले आहेत. तसेच, भारतीय संघानेही वनडे विश्वचषकात एकूण 29 सामने गमावले आहेत.
वनडे विश्वचषकात सर्वाधिक सामने गमावणारा संघ
43- श्रीलंका*
42- झिम्बाब्वे
37- इंग्लंड
36- पाकिस्तान
35- न्यूझीलंड
35- वेस्ट इंडिज
श्रीलंका ‘या’ स्थानी
श्रीलंका संघाने अर्जुन रणतुंगा यांच्या नेतृत्वाखाली 1996 विश्वचषकाचा किताब जिंकला होता. त्यानंतर संघ 2007, 2011 स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही पोहोचला होता. मात्र, संघाला पराभवाचा सामना करावा लागला. चालू विश्वचषकात संघ खराब प्रदर्शन करत आहे. त्यांनी विश्वचषक 2023 (World Cup 2023) आतापर्यंत 6 सामने खेळले असून त्यात फक्त 2 विजय मिळवले आहेत. अशात 4 गुणांसह ते सहाव्या स्थानी आहेत. त्यांचा नेट रनरेट -0.275 इतका आहे.
श्रीलंकेचा पराभव
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर या सामन्यात श्रीलंकेने 241 धावा केल्या होत्या. या धावा करताना श्रीलंकेकडून पथुम निसांका याने सर्वाधिक 46 धावा केल्या होत्या. तसेच, कुसल मेंडिसने 39, तर सदीरा समरविक्रमाने 36 धावा केल्या होत्या. संघाचा एकही फलंदाज टिच्चून फलंदाजी करू शकला नाही. त्यामुळे संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. अफगाणिस्तानसाठी फजलहक फारूकीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
याव्यतिरिक्त अफगाणिस्तानकडून फलंदाजी करताना रहमत शाह (62), हशमतुल्लाह शाहिदी (नाबाद 58) आणि अझमतुल्लाह उमरजाई (नाबाद 73) यांनी अर्धशतक झळकावत संघाला विजयी केले. (bad record sri lanka cricket team lost most matches in icc odi world cup afg vs sl 2023)
हेही वाचा-
बुमराह ‘बेबी बॉलर’ असल्याचं वक्तव्य अब्दुल रज्जाकने घेतलं मागे, बोलला ‘ही’ महत्त्वाची गोष्ट
अफगाणिस्तानच्या विजयाने ‘या’ संघाचे भलेमोठे नुकसान, Points Tableमध्ये घसरला सातव्या स्थानी