बांगलादेश क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. बांगलादेश क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू तमीम इकबाल आशिया चषक 2023 स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तमीम इकबालला पाठीची दुखापत असल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, त्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत बांगलादेशच्या वनडे संघाचे कर्णधारपदही सोडले आहे. बांगलादेशला बोर्डाला आशा आहे की, तमीम बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड संघात 21 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मायदेशातील वनडे मालिकेसाठी वेळेवर बरा व्हावा.
खरं तर, तमीम इकबाल (Tamim Iqbal) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (PM Sheikh Hasina) यांच्याशी बोलल्यानंतर त्याने आपला निर्णय बदलला होता. आता त्या निर्णयाच्या एक महिन्याच्या आतच ही नवीन बातमी समोर येत आहे की, तमीम इकबाल दुखापतग्रस्त झाल्यामुळे आशिया चषकातून बाहेर पडला आहे. तसेच, त्याने कर्णधारपदही सोडले आहे.
🚨 Major team news for Bangladesh ahead of Asia Cup 2023.
Details ⬇️https://t.co/43kXkv5AeT
— ICC (@ICC) August 4, 2023
विश्वचषकासाठी सज्ज होणार तमीम?
बांगलादेशचा खेळाडू तमीम सोमवारी (दि. 31 जुलै) पाठीवर उपचार घेऊन इंग्लंडहून परतला. त्याने तातडीचा उपाय म्हणून अनेक इंजेक्शनही घेतले आहेत. सध्या तमीम पूर्णपणे विश्रांती घेत आहे. तसेच, कमीत कमी तो पुढील आठवड्यापूर्वी आपली रिहॅब प्रक्रिया सुरू करू शकणार नाही. मात्र, उपचारानंतरही बांगलादेश क्रिकेट बोर्डाने कदाचित भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेसाठी तमीमला विश्रांती घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला आहे. अशात तो केव्हापर्यंत पुनरागमन करतोय, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच, बांगलादेश क्रिकेट बोर्ड वनडे संघाचे कर्णधारपद कुणाकडे सोपवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तमीम कर्णधार असताना त्याच्या अनुपस्थितीत अनेकदा लिटन दास (Litton Das) याने संघाचे नेतृत्व केले आहे. अशात असे बोलले जात आहे की, काही आठवड्यांनंतर सुरू होणाऱ्या आशिया चषकात लिटन दास बांगलादेश संघाची धुरा सांभाळताना दिसू शकतो.
तमीम इकबालची कारकीर्द
तमीम इकबाल 34 वर्षांचा असून त्याने बांगलादेश संघाकडून आतापर्यंत 70 कसोटी, 241 वनडे आणि 78 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 38.89च्या सरासरीने 5134 धावा, वनडेत 36.62च्या सरासरीने 8313 धावा आणि टी20त 24.08च्या सरासरीने 1758 धावा केल्या आहेत. (bangladesh cricketer out from asia cup 2023 due back injury also resigned odi captaincy know here)
महत्त्वाच्या बातम्या-
अर्रर्र! पराभवानंतर पंड्याच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद, यादीत धोनी आणि रहाणेचाही समावेश
‘या’ स्टार खेळाडूच्या सल्ल्यामुळे विंडीजने केला भारताचा पराभव, पॉवेलने सांगितला तो लाखमोलाचा सल्ला\