बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला 3 सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी (दि. 04 डिसेंबर) पार पडला. हा सामना बांगलादेशने आपल्या नावावर केला आहे. आता या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (दि. 07 डिसेंबर) ढाका येथे खेळला जाईल. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 11.30 वाजता सुरुवात होईल. तत्पूर्वी 11 वाजता नाणेफेक पार पडली. यावेळी बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात विजय मिळवत बांगलादेश मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल, तर भारतीय संघ हा सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.
या सामन्यात बांगलादेश (Bangladesh) संघात एक बदल आहे. हसन महमूद बाहेर पडला असून त्याच्या जागी नसुम अहमद याची एन्ट्री झाली आहे. तसेच, भारतीय संघाबद्दल बोलायचं झालं, तर शाहबाज अहमद (Shahbaz Ahmed) याच्या जागी अक्षर पटेलची (Axar Patel) एन्ट्री झाली आहे, तर कुलदीप सेन (Kuldeep Sen) संघाबाहेर पडला असून त्याच्या जागी उमरान मलिक (Umran Malik) याला ताफ्यात घेतल्याचे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने सांगितले आहे.
🚨 Toss Update 🚨
Bangladesh have elected to bat against #TeamIndia in the second #BANvIND ODI.
Follow the match ▶️ https://t.co/e77TiXdfb2 pic.twitter.com/4yTmlzKbez
— BCCI (@BCCI) December 7, 2022
दुसऱ्या वनडे सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, मोहम्मद सिराज, उमरान मलिक
बांगलादेश
नजमुल हुसेन शांतो, लिटन दास (कर्णधार), अनामूल हक, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्ला, अफिफ हुसेन, मेहदी हसन मिराझ, नसुम अहमद, इबादोत हुसेन, मुस्तफिजुर रहमान (bangladesh vs india 2nd odi ban won the toss and opt to bat first)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्रर्र! ऑस्ट्रेलियाचा कर्णधारच पडला दुसऱ्या कसोटीतून बाहेर, आता नेतृत्व कोण करणार?
‘काय तो सिक्स, काय तो भन्नाट कॅच’, आयसीसीने शेअर केलेला विराटचा व्हिडिओ पाहून तुम्हीही असंच म्हणाल