---Advertisement---

श्रीलंकेच्या चाहत्याने अश्विनशी पंगा घेऊन केली मोठी चूक, फिरकी मास्टरने दिले जशास तसे उत्तर

On: सोमवार, डिसेंबर 26, 2022 9:29 AM
Ravichandran-Ashwin
---Advertisement---

बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात दुसऱ्या कसोटी सामना अटतटीचा झाला. जसजसे सामना पुढे जात होता तसतसे विजयाचे माप कधी भारताकडे तर कधी बांगलादेशकडे झुकत होते. मात्र ढाकामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्याचे चित्र अष्टपैलू आर अश्विन याने संपूर्णपणे पालटले. त्याने ज्याप्रकारे फलंदाजी केली ती पाहून भारतीय चाहत्यांना आनंद झाला. 3 विकेट्सने जिंकलेल्या या सामन्याचा सामनावीर अश्विन ठरला. त्याने ट्विटरवर सामनावीर पुरस्कारासह फोटो पोस्ट केला. ज्यावर श्रीलंकेच्या चाहत्याने खोचट रिप्लाय दिला आहे. मग अश्विनही मागे राहतो का त्यानेही जशास तसे उत्तर दिले.

झाले असे की, अश्विनने पोस्ट केलेल्या फोटोला एका श्रीलंकेच्या नेटकऱ्याने ‘तुम्ही हा पुरस्कार मोमिनुल हलला द्यायला पाहिजे होता, ज्याने सोपा झेल सोडला. तो झेल त्याने पकडला असता तर भारताचा डाव 89 धावांवरच संपुष्टात आला असता.’ यानंतर भारताच्या फिरकीपटूने ज्याप्रकारे उत्तर दिले त्याने त्या चाहत्याचे एकप्रकारे एका झटक्यात तोंड बंद केले.

अश्विनने लिहिले, ‘ओह नो! मला वाटले मी तुला ब्लॉक केले होते. माफ करावे तो दुसरा आहे, काय नाव आहे त्याचे? हा डॅनियल अलेक्झांडर. कल्पना करा जर भारत क्रिकेट खेळत नसता तर तुम्ही दोघांनी काय केले असते.’

या सामन्यात भारताला विजयासाठी 145 धावा करायच्या होत्या. मात्र सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारत 37 धावांवर 4 विकेट्स गमावून बसला होता. तेव्हा अक्षर पटेल (34 धावा) आणि जयदेव उनाडकट (13 धावा) यांनी कसातरी धावफलक हलण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. हे दोघेही चौथ्या दिवशी बाद झाले. त्याबरोबरच रिषभ पंतदेखील 9 धावा करत तंबूत परतला. मग आता भारत हरतो की काय अशी लक्षणे दिसत असताना श्रेयस अय्यर आणि आर अश्विन यांनी सुरेख फलंदाजी केली.

अश्विन-अय्यर जोडीने आठव्या विकेटसाठी नाबाद 71 धावांची भागीदारी केली. भारताच्या दुसऱ्या डावात अश्विनने 62 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या. या सामन्यात त्याने एकूण 6 विकेट्सही घेतल्या. BANvIND Test Series R Ashwin Tweet for Sri Lanka Fan

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टॉप सहामधील स्थान आणखी मजबूत करण्यासाठी केरळा ब्लास्टर्स आणि ओडिशा एफसी भिडणार
सूर्यापासून विराट सर्वांवरच भारी पडला श्रेयस! सारे वर्षच केले आपल्या नावे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---