वनडे विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्तसमोर आले होते. तसेच ते आयपीएलच्या काही संघांच्या संपर्कात असल्याचे देखील म्हटले गेलेले. मात्र, आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून मुदतवाढ दिल्याची घोषणा केली आहे. त्यांच्यासोबतच फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ती दिलीप हे देखील संघासोबत कायम राहतील.
NEWS ???? -BCCI announces extension of contracts for Head Coach and Support Staff, Team India (Senior Men)
More details here – https://t.co/rtLoyCIEmi #TeamIndia
— BCCI (@BCCI) November 29, 2023
वन डे विश्वचषकात भारतीय संघाने सलग दहा विजय मिळवले होते. मात्र, अंतिम सामना संघाने गमावला. विश्वचषकापूर्वीच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपण यानंतर भारतीय संघासोबत नसेल असे संकेत दिले होते. त्यांच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण हे भारतीय संघाचे प्रशिक्षक होतील असे म्हटले जात होते. मात्र, संघाच्या एकूण कामगिरीचा विचार करता बीसीसीआयने द्रविड यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला.
पुढील वर्षी जून महिन्यात भारतीय संघाला टी20 विश्वचषक खेळायचा आहे. या विश्वचषकापर्यंत तरी द्रविड हेच असतील हे नक्की झाले आहे. यासोबतच फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांचा देखील कार्यकाळ वाढला. रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर 2021 मध्ये द्रविड भारतीय संघासोबत जोडले गेले होते.
(BCCI announces extension of contracts for Head Coach Rahul Dravid and Support Staff Of Team India)
महत्वाच्या बातम्या
मुंबईच्या गोलंदाजाचे आरसीबी चाहत्यांबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘आरसीबीचे चाहते नेहमीच…’
टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये रोहितची बादशाहत संपली! ग्लेन मॅक्सवेलच्या शतकामुळे भारतीय कर्णधाराची डोकेदुखी वाढली