---Advertisement---

टीम इंडियाचे २०१९-२० मधील घरच्या सामन्यांचे वेळापत्रक घोषित; पुणे-मुंबईमध्ये होणार हे सामने

On: मंगळवार, जून 4, 2019 10:38 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने(बीसीसीआय) सोमवारी(3 जून) भारतीय संघाचे 2019-20 या मोसमाचे मायदेशातील सामन्यांचे वेळापत्रक घोषित केले आहे. या मोसमात भारतीय संघ मायदेशात 5 कसोटी, 9 वनडे आणि 12 टी20 सामने खेळणार आहे.

तसेच या मोसमात दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, वेस्टइंडीज, जिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया संघ भारताचा दौरा करणार आहे.

त्याबरोबरच या मोसमात होणारे 5 कसोटी सामने हे टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असतील.

या मोसमाची सुरुवात 15 सप्टेंबर पासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या फ्रिडम ट्रॉफी- गांधी-मंडेला मालिकेने होईल. ही मालिका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होईल. या दरम्यान भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात 3 टी20 आणि 3 कसोटी सामन्यांच्या मालिका होणार आहे.

तसेच त्यानंतर बांगलादेश संघ नोव्हेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येईल. बांगलादेश विरुद्ध भारतीय संघ 3 टी20 आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. डिसेंबरमध्ये वेस्टइंडिजचा संघ 3 टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येईल.

2020 च्या सुरुवातीला जानेवारीमध्ये झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यात झिम्बाब्वे भारताविरुद्ध 3 टी20 सामने तर ऑस्ट्रेलिया 3 वनडे सामने खेळणार आहे. मार्चमध्ये पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर येणार असून 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

यांतील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑक्टोबर 2019 मध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना आणि झिम्बाब्वे विरुद्ध जानेवारी 2020 मध्ये होणारा शेवटचा टी20 सामना पुण्यात खेळवला जाणार आहे. तसेच मुंबईत डिसेंबर 2019 मध्ये वेस्ट इंडीज विरुद्धचा पहिला टी20 सामना आणि जानेवारी 2020मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला वनडे सामना होणार आहे.

असे आहे भारतीय संघाचे 2019-20 मोसमाचे मायदेशातील वेळापत्रक – 

#फ्रिडम ट्रॉफी – 2019(भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका) – 

टी20 मालिका

15 सप्टेंबर – पहिला टी20 सामना – धरमशाला

18 सप्टेंबर – दुसरा टी20 सामना – मोहाली

22 सप्टेंबर – तिसरा टी20 सामना – बंगळूरु

कसोटी मालिका-

2-6 ऑक्टोबर – पहिली कसोटी – विशाखापट्टणम

10-14 ऑक्टोबर – दुसरी कसोटी – रांची

19-23 ऑक्टोबर – तिसरी कसोटी – पुणे

#बांगलादेशचा भारत दौरा – 2019

टी20 मालिका –

3 नोव्हेंबर – पहिला टी20 सामना – दिल्ली

7 नोव्हेंबर – दुसरा टी20 सामना –  राजकोट

10 नोव्हेंबर – तिसरा टी20 सामना – नागपूर

कसोटी मालिका –

14-18 नोव्हेंबर – पहिली कसोटी – इंदोर

22-26 नोव्हेंबर – दुसरी कसोटी – कोलकता

#वेस्ट इंडिजचा भारत दौरा – 2019

टी20 मालिका –

6 डिसेंबर – पहिला टी20 सामना – मुंबई

8 डिसेंबर – दुसरा टी20 सामना – तिरुअनंतपुरम

11 डिसेंबर – तिसरा टी20 सामना – हैद्राबाद

वनडे मालिका –

15 डिसेंबर – पहिला वनडे – चेन्नई

18 डिसेंबर – दुसरा वनडे – विशाखापट्टणम

22 डिसेंबर – तिसरा वनडे – कटक

#झिम्बाब्वेचा भारत दौरा – 2020

5 जानेवारी – पहिला टी20 सामना – गुवाहाटी

7 जानेवारी – दुसरा टी20 सामना – इंदोर

10 जानेवारी – तिसरा टी20 सामना – पुणे

#ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा – 2020

14 जानेवारी – पहिला वनडे – मुंबई

17 जानेवारी – दुसरा वनडे – राजकोट

19 जानेवारी – तिसरा वनडे – बंगळूरु

#दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा – 2020

12 मार्च – पहिला वनडे – धरमशाला

15 मार्च – दुसरा वनडे – लखनऊ

18 मार्च – तिसरा वनडे – कोलकता

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंडच्या या खेळाडूने घेतले तब्बल ४ झेल, विश्वविक्रमाचीही केली बरोबरी

विराट कोहलीच्या टीम इंडियाला भारतीय फुटबॉल संघाकडून खास शुभेच्छा, पहा व्हिडिओ

विश्वचषक २०१९: पहिल्या सामन्याआधी टीम इंडियाचा हा खेळाडू झाला फिट, पण खेळण्यावर अजूनही प्रश्नचिन्ह

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment