साल २०१८ पासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) पुरुषांच्या आयपीएल हंगामादरम्यान महिला टी२० चॅलेंज ही स्पर्धा खेळवली जाते. ही स्पर्धा महिला आयपीएल म्हणूनही ओळखली जाते. मात्र, गेल्यावर्षी कोरोनाच्या संकटात ही स्पर्धा खेळवण्यात आली नव्हती. पण, २०२२ मध्ये या स्पर्धेचे पुनरागमन झाले असून ही स्पर्धा २३ मेपासून खेळवली जाणार आहे. आता या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची नावे समोर आली आहेत.
महिला टी२० चॅलेंज स्पर्धेत (Women’s T20 Challenge) सुपरनोवाज, ट्रेलब्लेझर्स आणि वेलोसिटी हे तीन संघ खेळताना दिसणार आहे. यातील सुपरनोवाजचे (Supernovas) हरमनप्रीत कौर (Deepti Sharma) नेतृत्व करणार आहे, तर ट्रेलब्लेझर्सचे (Trailblazers) नेतृत्व स्म्रीती मंधनाकडे (Smriti Mandhana) असणार आहे. याशिवाय दिप्ती शर्मा (Deepti Sharma) वेलोसिटी (Velocity) संघाची कर्णधार असणार आहे. या तिन्ही संघांसाठी अखिल भारतीय महिला निवड समीतीने खेळाडूंची (Squads For Women’s T20 Challenge) निवड केली असून प्रत्येक संघात १६ खेळाडू असणार आहेत.
या तिन्ही संघात मिळून भारताव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया या संघांतील काही स्टार खेळाडूंचा समावेश आहे. प्रत्येक संघात एकूण ४ परदेशी खेळाडू असे मिळून १२ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
ही स्पर्धा २३ मे ते २८ मे दरम्यान पुण्यातील गंहुजेमधील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. पहिला सामना २३ मे रोजी ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोवाज संघांत होईल. त्यानंतर २४ मे रोजी सुपरनोवाज विरुद्ध वेलोसिटी संघात होणार आहे. तसेच २६ मे रोजी वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर्स संघात सामना होईल. त्यानंतर २८ मे रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. हे चारही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होतील.
असे आहेत संघ –
सुपरनोवाज – हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया, ऍलेना किंग, आयुषी सोनी, चंदू व्ही, डिआंड्रा डॉटिन, हरलीन देओल, मेघना सिंग, मोनिका पटेल, मुस्कान मलिक, पूजा वस्त्राकार, प्रिया पुनिया, राशी कनोजिया, सोफी एक्लेस्टोन, सून लुस, मानसी जोशी.
ट्रेलब्लेझर्स – स्मृती मंधना (कर्णधार), पूनम यादव, अरुंधती रेड्डी, हेली मॅथ्यूज, जेमिमाह रॉड्रिग्ज, प्रियांका प्रियदर्शिनी, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग, रिचा घोष, एस मेघना, सायका इशाक, सलमा खातून, शर्मीन अख्तर, सोफिया ब्राऊन, सुजाता मलिक, एसबी पोखरकर
वेलोसिटी – दीप्ती शर्मा (कर्णधार), स्नेह राणा, शफाली वर्मा, अयाबोंगा खाका, केपी नवगिरे, कॅथरीन क्रॉस, कीर्ती जेम्स, लॉरा वोल्वार्ड, माया सोनवणे, नत्थकन चंटम, राधा यादव, आरती केदार, शिवाली शिंदे, सिमरन बहादूर, यस्तिका भाटिया, प्रणवी चंद्रा,
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
जबराट! बटलर-परागने मिळून बाऊंड्रीजवळ अफलातून कॅच घेत कृणालला धाडले माघारी, पाहा Video
हिला डाला ना! ओडियन स्मिथ इतका जोरात शिंकला की, पंजाबचे खेळाडू धडाधड कोसळले, Video व्हायरल