विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. हा सामना झाल्यानंतर भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल दुखापतग्रस्त असल्याची माहिती समोर आली होती. त्याची दुखापत गंभीर असल्यामुळे तो अगामी इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. दरम्यान, असेही समजत आहे की भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गिलला परत बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघ व्यवस्थपकांनी शुबमनऐवजी पृथ्वी शॉला इंग्लंडला बोलवण्याची मागणी केली होती. परंतु, निवडकर्त्यांनी याबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही.
क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, शुबमन गिल दुखापतग्रस्त झाला होता, ज्यामुळे आगामी कसोटी मालिकेत त्याला खेळण्याची संधी मिळणार नाही. शुबमन गिल भारतात केव्हा परतणार आणि त्याच्याऐवजी दुसऱ्या कुठल्या खेळाडूला पाठवणार का, याबाबत कुठलाही खुलासा केला गेला नाही.(Bcci asks shubman gill to return India no replacement yet)
असे म्हटले जात आहे की,शुबमन गिलच्या ऐवजी दुसऱ्या कुठल्या खेळाडूला इंग्लंडला पाठवण्याबाबत कुठलीही रणनिती आखली गेली नाही. संघ व्यवस्थापकांनी आधीच स्पष्ट केले आहे की, केएल राहुलला कसोटी क्रिकेटमध्ये सलामी फलंदाजाची भूमिका देण्यात येणार नाही. ज्यानंतर मयंक अगरवाल आणि पदार्पणाच्या प्रतीक्षेत असलेला अभिमन्यु ईश्वरनला रोहित शर्मासोबत सलामी फलंदाजी करण्याची संधी मिळू शकते.
एका अधिकाऱ्याने क्रिकबजला म्हटले आहे की,”संघ व्यवस्थापकांनी शुबमन गिल ऐवजी संघात कोणाला स्थान द्यावे हा निर्णय घेण्याची अनुमती निवडकर्त्यांना दिली आहे.मग तो पृथ्वी शॉ,देवदत्त पडीक्कल असो किंवा इतर कोणीही असो.
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
असा आहे इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे , हनुमा विहारी, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल, रुध्दीमान साहा
राखीव खेळाडू : अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नगवासवाला, केएस भारत
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: एमएस धोनीच्या करियरची टाईमलाईन
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने धोनीला दिल्या अनोख्या शुभेच्छा, केला जबरदस्त व्हिडिओ शेअर
वाढदिवस विशेष: ‘असा’ पराक्रम करणारा एमएस धोनी आहे केवळ दुसराच यष्टीरक्षक