भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत यावर्षी आयपीएलमध्ये अपेक्षित कामगिरी करू शकला नाहीये. त्याच्या नेतृत्तावातील दिल्ली कॅपिटल्स संघ देखील प्लेऑफमध्ये स्थान बनवू शकला नाहीये. एवढेच नाही, त्याने या हंगामात अनेक चुकीचे डीआरएस घेतले आणि यासाठी त्याच्यावर टीका देखील केली गेली आहे. असे असले, तरी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने मात्र त्याचे समर्थन केले आहे.
भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) आणि माजी दिग्गज एमएस धोनी (MS Dhoni) यांची अनेकदा तुलना केली जाते. अनेक जाणकार पंतला ‘भविष्यातील धोनी’, असेही म्हणतात. आयपीएल २०२२मध्ये पंतला त्याच्या नेहमीच्या अंदाजात प्रदर्शन करता आले नाही. या हंगामातील १४ सामन्यांमध्ये पंतने ३०.९१च्या सरासरीने ३४० धावा केल्या आहेत. या संपूर्ण हंगामात त्याच्या बॅटमधून एकही शतक किंवा अर्धशतक निघाले नाही. पंतच्या फॉर्मच्या परिणाम त्याच्या संघावर देखील पडला आहे. साखळी फेरीतील शेवटचा सामना पराभूत झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स पाचव्या क्रमांकावर राहिला आणि आरसीबीने प्लेऑफमधील त्यांची जागा मिळवली.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याच्या मते धोनीचा अनुभव खूप मोठा आहे आणि रिषभ पंत अजूनही नवखा आहे. गांगुलीच्या मते धोनीसोबत त्याची तुलना योग्य नाहीये. कोलकातामध्ये एका कार्यक्रमात बोलताना गांगुली म्हणाले की, “पंतची तुलना धोनीसोबत करू नका. धोनीकडे खूप अनुभव आहे. त्याने आयपीएल, कसोटी आणि एकदिवसीय अशा एकूण ५०० पेक्षा अधिक सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. धोनीसोबत पंतची तुलना होऊ शकत नाही.” गांगुलींप्रमाणे काही दिवसांपूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पॉंटिंगने देखील काही दिवसांपूर्वी पंतची पाठराखण केली होती. पॉंटिंगच्या म्हणण्यानुसार पंत नवखा आहे आणि कर्णधारपदाच्या अनेक गोष्टी अजूनही शिकत आहे.
चालू हंगामात पंतने कर्णधाराच्या रूपात अनेक चुकीचे निर्णय घेतले. त्याने घेतलेला डीआरएसचा निर्णय देखील अनेकदा चुकीचा ठरला. तसेच राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या एका सामन्यात त्याने पंचांसोबत देखील वाद घातल्याचे दिसले होते. त्याच्या एकंदरीत वर्तवणुकीमुळे चाहते आणि जाणकार काहीसे निराश दिसले आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्वालिफायर सामन्याच्या आधीच साहाने दिली स्वतःच्या फिटनेसविषयी महत्वाची अपडेट, वाचा काय म्हणाला
टीममेटनेच हरमनप्रीतला दिला दगा अन् झाली रनआऊट, मैदान सोडताना अशी काढली भडास – Video