---Advertisement---

कोरोनामुळे कोणत्याच बोर्डाला न जमलेलं काम बीसीसीआयने केलं, क्रिकेटपटूही झाले खूश

On: शनिवार, एप्रिल 11, 2020 7:56 PM
---Advertisement---

कोरोना व्हायरसचा फटका क्रीडा जगताला बसला आहे. त्यामुळे क्रिकेट जगतात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशामध्ये या व्हायरसमुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या प्रमुख क्रिकेट बोर्डांनी खेळाडूंच्या पगारामध्ये कपात करण्याचे संकेत दिले आहेत. परंतु बीसीसीआयने यावेळी आपल्या खेळाडूंची काळजी घेत त्यांना ३ महिन्याचा पगार देऊ केला आहे.

यावेळी बीसीसीआयने (BCCI) स्पष्ट केले की, कोविड-१९ मुळे तयार झालेल्या या कठीण परिस्थितीत बीसीसीआय कोणालाही चिंता करण्यासारखी परिस्थिती निर्माण करणार नाही.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “भारतात २४ मार्चपासून २१ दिवसांचे लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आले आहे. असे असले तरीही बीसीसीआय कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे. तसेच बोर्डाने आपल्या खेळाडूंच्या केंद्रीय करारातील ३ महिन्यांची रक्कम दिली आहे.”

बीसीसीआयच्या दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आयपीएल होणे गरजेचे आहे. कारण जर आयपीएल झाले नाही तर, भाग धारकांचे नुकसान होईल. याचे आयोजन केव्हा होईल हे सांगता येणार नाही. कारण सप्टेंबरमध्ये आशिया चषक (Asia Cup) होणार आहे. तसेच इंग्लंडविरुद्ध (England) देशांतर्गत मालिकादेखील खेळायची आहे. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये टी२० विश्वचषकाचे (T20 World Cup) आयोजन होईल.

जर तुम्हाला हेच माहिती नसेल की गोष्टी केव्हापर्यंत सामान्य होणार आहेत, त्यावेळी तुम्ही आयपीएल केव्हा होणार हे कसे काय म्हणू शकता, असेही बीसीसीआय अधिकारी पुढे म्हणाला.

ट्रेंडिंग घडामोडी-

-जोगिंदर शर्मा म्हणतो, या कारणामुळे मी घरीच जात नाही

-एका वर्षात सर्वाधिक वनडे धावा करणारे ५ खेळाडू

-भारताकडून वनडे पदार्पणातचं दणक्यात सुरुवात करणारे ५ फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---