भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने रविवारी (26 मार्च) रोजी 2022-23 हंगामासाठी टीम इंडिया (वरिष्ठ पुरुष) साठी वार्षिक खेळाडू करार जाहीर केला आहे. या नव्या करारात 26 खेळाडूंना स्थान मिळाले. यामधील काही खेळाडूंना बढती मिळाली तर, काहींची अवनती झाली. याव्यतिरिक्त काही खेळाडूंना या करारात स्थान देखील मिळाले नाही.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बीसीसीआयने चार श्रेणींमध्ये संघातील खेळाडूंची विभागणी केली आहे. A+ श्रेणीतील खेळाडूंना 7 कोटी रुपये दिले जातील. A श्रेणीतील खेळाडूंना 5 कोटी, B श्रेणीतील खेळाडूंना 3 कोटी, तर C श्रेणीतील खेळाडूंना 1 कोटी रुपये दिले जातील.
NEWS 🚨- BCCI announces annual player retainership 2022-23 – Team India (Senior Men).
More details here – https://t.co/kjK4KxoDdK #TeamIndia
— BCCI (@BCCI) March 26, 2023
खेळाडूंच्या ए + श्रेणीमध्ये यावेळी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रीत बुमराह यांच्यासह रवींद्र जडेजा याचा देखील समावेश करण्यात आला. जवळपास वर्षभरापासून संघाबाहेर असलेला तसेच पुढील सहा महिने तरी संघात परतण्याची अपेक्षा नसलेल्या बुमराह याला या गटात ठेवल्याने अनेकांनी आश्चर्य देखील व्यक्त केले.
संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या हा थेट सी श्रेणीतून अ श्रेणीत दाखल झाला. अष्टपैलू अक्षर पटेल याला देखील प्रथमच अ श्रेणी स्थान मिळाले. तसेच शुबमन गिल व सूर्यकुमार यादव हे ब श्रेणीत पोहोचले. तर, केएल राहुल व शार्दुल ठाकूर यांची देखील श्रेणीमध्ये घसरण झाली.
त्याचवेळी या करारात असे काही खेळ राहिले ज्यांना स्थानही मिळाले नाही. यामध्ये माजी कर्णधार अजिंक्य रहाणे, अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, मयंक अगरवाल, दीपक चहर व वृद्धिमान साहा यांचा समावेश आहे.
2022-2023 वर्षासाठी बीसीसीआयचे वार्षिक करार
A+ श्रेणी (7 कोटी)
रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा
A श्रेणी (5 कोटी)
हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, रिषभ पंत, अक्षर पटेल
B श्रेणी (3 कोटी)
चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, शुबमन गिल
C श्रेणी (1 कोटी)
उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकुर, ईशान किशन, दीपक हुड्डा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत.
(BCCI New Annual Contract Hardik Promoted Rahul Demoted Rahane Bhuvi Excluded)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सच्या विजयाला वादाची काळी किनार! शफालीला बाद देण्यावरून उलटसुलट चर्चा सुरू
नॅट सिव्हरची पैसा वसूल कामगिरी! 3.20 कोटींच्याच दर्जाचा खेळ दाखवत बनवले मुंबईला चॅम्पियन