केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी स्पष्ट केले आहे की सध्याच्या कोरोना व्हायरसच्या परिस्थितीत रिकाम्या स्टेडियममध्ये क्रीडा सामने खेळवण्यासाठी देश तयार असावा. रिजिजू यांच्या या विधानानंतर अनेकांच्या मनात सध्या अनिश्चित काळासाठी स्थगित झालेल्या आयपीएलच्या १३ व्या मोसमाच्या आयोजनाबद्दल विचार आला.
बीसीसीआय सप्टेंबर-नोव्हेंबर दरम्यान आयपीएलच्या १३ व्या मोसमाचे आयोजन करण्याचा विचार करत आहे. पण बीसीसीआयने प्रेक्षकांच्या सुरक्षेला पहिले प्राधान्य असल्याचेही स्पष्ट केले आहे.
आयएएनएसशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की ‘कोणालाही अशा कठीण काळात पैसे (प्रवेश शुल्क) मिळण्याची चिंता नसते. चाहत्यांची सुरक्षितता निश्चितच प्राधान्य असेल. जेव्हा क्रिकेट सुरु होईल तेव्हा प्रसारण महसूल हा बीसीसीआय आणि राज्य संघटनांच्या निर्वाहतेसाठी आवश्यक असलेल्या महसुलातील पहिला भाग आहे. आयपीएलचीही तीच स्थिती आहे.’
‘कोणीही प्रवेश शुल्काला नाही म्हणणार नाही. पण चाहत्यांच्या सुरक्षाआधी कोणीही प्रवेश शुल्काला प्राधान्य देणार नाही. ज्यांनी सामने आयोजित केले आहेत त्यांना ही मूलभूत तत्त्वे समजतात. क्रीडामंत्र्यांनी निवेदन दिले आहे आणि ते सरकारचे प्रतिनिधित्व करतात, म्हणून प्रत्येकाने याची काळजी घ्यावी आणि परिस्थितीचे गांभीर्य समजून घेतले पाहिजे.’
भारतात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात खेळाडूंना वैयक्तिक सरावासाठी क्रीडा संकुल खुले करण्याची सुट दिली आहे.
तसेच रिजिजू यांनी म्हटले होते की कोरोना व्हायरसच्या स्थितीची तपासणी करून सरकार आयपीएलबाबत निर्णय घेईल.
इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार रिजिजू म्हणाले, ‘भारतात, सरकारला निर्णय घ्यावा लागेल आणि परिस्थितीच्या आधारे निर्णय घेतला जाईल. स्पर्धा आयोजित करायच्या म्हणून आपण आरोग्याचा धोका पत्करू शकत नाही. आमचे लक्ष आत्ता कोविड -१९ ला लढा देण्यावर आहे आणि त्याच वेळी पुन्हा सामान्यस्थितीत येण्यासाठी एका यंत्रणेला काम करावे लागेल. तारखांची पुष्टी करणे अवघड आहे परंतु मला खात्री आहे की यावर्षी आपल्याकडे काही प्रकारच्या क्रीडा स्पर्धा होतील.’
‘आम्हाला सल्ला देण्यात आला आहे की आरोग्य आणि सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे आणि त्याशिवाय आम्हाला गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल. आम्हाला स्पर्धा सुरू करायच्या आहेत पण त्याआधी खेळाडूंना पुन्हा सरावास सुरुवात करावी लागेल. आपण त्वरित स्पर्धा सुरू करू शकत नाही.’
ट्रेंडिंग घडामोडी –
रोहित शर्माला लॉकडाऊनदरम्यान या गोष्टीची येतेय सर्वात जास्त आठवण
…नाहीतर रोहित शर्माचे टीम इंडियात परतणे होणार ‘महाकठीण’
सौरव गांगुली आणि जय शहा यांच्यासाठी बीसीसीआयने घेतली सुप्रीम कोर्टात धाव