कोरोना व्हायरसमुळे जवळपास ४ महिन्यांपासून भारतीय संघाने एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही. कोणालाही माहिती नाही की, भारतीय संघ केव्हा मैदानावर पुनरागमन करणार आहे? परंतु, आशा केली जात आहे की, या वर्षाच्या शेवटी म्हणजे डिसेंबरमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ शकतो. मात्र, यावेळी भारतीय संघ जुन्या जर्सीसोबत नव्हे तर नव्या जर्सीसोबत खेळताना दिसून येईल.
सध्या भारतीय संघाच्या किटचे प्रायोजक नाइकी आहेत आणि सप्टेंबर महिन्यात बीसीसीआयचा नाइकीसोबतचा करार संपणार आहे. त्यामुळे बोर्डाने निविदा पत्रिकेद्वारे प्रायोजन आणि अधिकृत विक्री भागीदारी अधिकाऱ्यांसाठी नवे टेंडर काढले आहे. नाइकीकडे भारतीय संघाच्या पोषाखाचा अधिकार आहे. त्यांनी ३० कोटीच्या रॉयल्टीसह बीसीसीआयसोबत ३७० कोटी रुपयात ४ वर्षांचा करार केला होता. BCCI Replace Team India Shirt Sponsor Nike
बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पात्रतेची आवश्यकता आणि जबाबदाऱ्या यांसह बोली सादर करणे आणि त्यांचे मूल्यांकन करण्याचे नियम आणि अटी आयटीटीमध्ये लिहिलेल्या आहेत. तसेच प्रसिद्धीपत्रकात बीसीसीआयला विनाकारण कोणत्याही स्तरावर बोली प्रक्रिया रद्द करणे किंवा त्याच्यामध्ये सुधार करण्याचा अधिकार आहे.
बीसीसीआय आणि नाइकी यांच्यामध्ये ४ वर्षांसाठी ३७० कोटी रुपयांचा करार करण्यात आला होता. या करारानुसार नाइकीला प्रत्येक सामन्यासाठी ८५ लाख रुपये द्यायचे होते. सोबतच रॉयल्टीचाही समावेश होता. परंतु, कोरोना व्हायरसमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नाइकीला बरेच नुकसान झाले आहे. त्यामुळे नाइकी त्यांचा करार वाढवण्याच्या प्रयत्नात होती. पंरतु, बीसीसीने यासाठी संमती दिली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतातील त्या खेळीनंतर तब्बल ९ वर्ष पाहिली वाट, आज इंग्लंडविरुद्ध केला खास कारनामा
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या होतील ५ कोरोना टेस्ट, काय आहे कारण?
तो एक शांत क्रिकेटर होता, द्रविडच्या मदतीने राजस्थान रॉयल्समध्ये झाला विस्फोटक फलंदाज
ट्रेडिंग लेख –
वाढदिवस विशेष: आमीर सोहेलला “पेहली फुरसत से निकल” म्हणणारा वेंकटेश प्रसाद
आयपीएल २०२०- या ५ सलामी जोड्यांवर असेल सर्वांची नजर
वाढदिवस विशेष: माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद बद्दल या ५ गोष्टी माहित आहेत का?