भारतीय क्रिकेट संघ २७ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सध्या तयारी करत आहे. भारतीय संघाला या दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यानंतर तीन टी -२० सामने आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. हा दौरा मोठा असल्यामुळे व कोरोना महामारीच्या कडक नियमामुळे संघामध्ये बीसीसीआयने राखील गोलंदाजांनाही ऑस्ट्रेलियामध्ये पाठवले आहे. त्यामध्ये युवा गोलंदाज कार्तिक त्यागीचा देखील सहभाग आहे.
यावेळी ऑस्ट्रेलियात त्यागी भारतीय संघासह सरावही करत असून तो भारताच्या वरिष्ठ गोलंदाजांकडून मार्गदर्शनही घेत आहे. नुकतेच बीसीसीआयने त्याचा जसप्रीत बुमराहबरोबरचा एक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये बुमराह आणि त्यागी चर्चा करताना दिसून येत आहेत.
या फोटोंना बीसीसीआयने कॅप्शन दिले आहे की ‘आपल्या प्रवासात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे सर्वोत्कृष्ट व्यक्ती असेल तेव्हा!’
When you have best in the business to guide you in your journey. @Jaspritbumrah93 @tyagiktk #TeamIndia pic.twitter.com/oDUt2ucu2s
— BCCI (@BCCI) November 25, 2020
त्यागीने आयपीएलमध्ये केले सर्वांना प्रभावित –
कार्तिक त्यागीने आयपीलच्या या हंगामात आपल्या खेळाने सर्वांनाच प्रभावित केले आहे. आयपीलच्या या हंगामात तो राजस्थान रॉयल्सकडून खेळला. यावेळी त्यागीच्या गोलंदाजीत गती व अचूक चेंडू टाकण्याची विविधता दिसून आली. आयपीलच्या या हंगामात त्यागीने १० सामन्यात ९ विकेट घेतल्या व अनेक दिग्गज फलंदाजांना बाद केले.
२०२० च्या १९ वर्षांखालील विश्वचषकातही त्यागीची शानदार कामगिरी –
२०२० च्या १९ वर्षांखालील विश्वचषकाचा उपविजेता ठरलेल्या भारतीय संघातही त्यागीचा समावेश होता. त्याने या विश्वचषकात ६ सामन्यात १३.९१ च्या सरासरीने ११ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याने सर्वांचे लक्ष वेधले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
KBC मध्ये ७ कोटी रुपयांसाठी विचारला क्रिकेटबद्दल अवघड प्रश्न, वाचा काय आहे उत्तर?
“यष्टीरक्षकांसाठी धोनी एक आदर्श, भूमिका कशी पार पाडायची हे त्याने दाखवून दिलं“
ट्रेंडिंग लेख
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणारे ३ भारतीय फलंदाज; धोनीचाही समावेश
या पाच सामन्यात भारतीय अष्टपैलू खेळाडूंनी गाजवली होती ऑस्ट्रेलियाची मैदाने
ऑस्ट्रेलियन फलंदाजांना टी२०त सर्वाधिक वेळा तंबूचा रस्ता दाखवणारे टीम इंडियाचे ३ गोलंदाज