नवी दिल्ली | इंडियन प्रीमियर लीगचा १३वा हंगाम झाला नाही तर भारतीय क्रिकेट बोर्डाला मोठे नुकसान सहन करावे लागु शकते. बीसीसीआयच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर याचा खुलासा केला आहे.
आयपीएलजर झाली नाही तर बीसीसीआयचे अंदाजे ४० बिलीयन डाॅलर (५३० मिलीयन डाॅलरचे) पेक्षा मोठे नुकसान होऊ शकते. आम्ही नुकसान नक्की किती होणार याचा अंदाज तेव्हाच लावु शकतो जेव्हा आम्हाला किती सामने रद्द झाले आहेत याची नक्की माहिती मिळेल, असा तो अधिकारी पुढे म्हणाला.
भारतातील क्रिकेटचे प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्सने २०२२ पर्यंत टीव्ही प्रसारणाचे हक्क २२० मिलीयन डाॅलर्सला विकत घेतले आहेत. त्यांनी २०२०मध्ये ४०० मिलीयन डाॅलर कमाईचे लक्ष ठेवले होते.
खेळाडूंच्या मानधनात कपात करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. परंतु हा निर्णय घ्यायचाच झाला तर तो अगदीच शेवटच्या टप्प्यावर घेतला जाईल, असेही तो अधिकारी पुढे म्हणाला.