इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार स्टोक्स याच्या नेतृत्वात नुकतीच इंग्लंडने प्रतिष्ठेची ऍशेस मालिका बरोबरीत सोडवली. पहिल्या दोन सामन्यात पराभूत झाल्यानंतरही शानदार पुनरागमन करत त्यांनी मालिका बरोबरीत संपवली. सर्वत्र संघाचे व कर्णधार स्टोक्सचे कौतुक होत असतानाच विमानतळावर त्याला एक वाईट अनुभव आला. त्याचे सामानच त्याला मिळाले नसल्याचे ट्विट त्याने केले आहे.
लंडन येथे झालेल्या पाचव्या कसोटीत इंग्लंड संघ अखेरच्या दिवसाच्या सुरुवातीला पराभवाच्या छायेत होता. मात्र, गोलंदाजांनी दमदार कामगिरी करताना ऑस्ट्रेलियावर 49 धावांनी विजय मिळवत मालिका 2-2 अशा बरोबरीत सोडवली. यानंतर सर्व खेळाडू आपापल्या घरी रवाना झाले. असे असताना कर्णधार स्टोक्स याचे सामान मात्र त्याला मिळाले नाही. त्याने ट्विट करत याबाबत माहिती देताना म्हटले,
Bags not turned up off the plane @British_Airways and help would be greatly appreciated
— Ben Stokes (@benstokes38) August 2, 2023
‘माझ्या बॅग अजून मिळालेल्या नाहीत. ब्रिटिश एअरवेज तुम्ही मदत केली तर फार कौतुक होईल’
यापूर्वी देखील विमानतळावर अनेक क्रिकेटपटूंचे सामान गहाळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच भारताचा अष्टपैलू शार्दुल ठाकूर याला मुंबई विमानतळावर असाच अनुभव आला होता. त्याने देखील सोशल मीडियाची मदत घेत याबाबत माहिती दिली होती.
बेन स्टोक्स आता बऱ्याच कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहणार आहे. वनडे क्रिकेटमधून त्याने मागील वर्षी निवृत्ती जाहीर केले होती. तसेच निवडक टी20 मालिका तो खेळत असतो. अशा परिस्थितीत तो पुढील वर्षी जानेवारी महिन्यात भारत दौऱ्यावर कसोटी सामना खेळताना दिसेल. ऍशेस मालिकेत दुखापती सह खेळताना देखील त्याने उत्कृष्ट कामगिरी करताना 400 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.
(Ben Stokes Bags Stolen From Airport He Tweet)
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग! पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान यांना 3 वर्षांची शिक्षा, काय आहे नेमकं प्रकरण?
विराटने ज्या गोलंदाजाला चोपले, कार्तिकने त्याचेच गायले गोडवे; म्हणाला, ‘तो डेथ ओव्हर स्पेशलिस्ट…’