इंग्लंडमध्ये सध्या काउंटी चँपियनशीप डिवीजन २ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत नुकताच इंग्लंड संघाचा कर्णधार बनलेला बेन स्टोक्स डरहम संघाचे प्रतिनिधित्त्व करत आहे. दरम्यान डरहम विरुद्ध ग्लॅमोर्गन यांच्यात १२ मे पासून सुरू असलेल्या सामन्यात स्टोक्सने अर्धशतकी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याच्यासोबत छोटासा अपघात घडला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मार्नस लॅब्यूशेन (Marnus Labuschagne) ग्लॅमोर्गन संघाकडून खेळत असताना त्याच्या एका चेंडूने स्टोक्सला (Ben Stokes) जखमी केले. ज्यानंतर तो मैदानावर (Ben Stokes Collapsed) कोसळला.
तर झाले असे की, लॅब्यूशेन डरहमच्या डावातील एक षटक टाकण्यासाठी आला असताना स्टोक्स स्ट्राईकवर होता. सहसा लेगब्रेक गोलंदाजी करणाऱ्या लॅब्यूशेनने स्टोक्सला शॉर्ट चेंडू टाकला, ज्यावर स्टोक्स स्वतला सांभाळू शकला नाही. हा चेंडू त्याच्या पायाला जोराने लागला आणि तो धापकन मैदानावर पडला. काही मिनिटांसाठी मैदानावर पडून राहिल्यानंतर तो पुन्हा उठला आणि फलंदाजीसाठी सज्ज झाला. हा अपघात झाला असताना स्टोक्स ५२ चेंडूंमध्ये ३३ धावांवर खेळत होता. स्टोक्सचा हा व्हिडिओ काउंटी चँपियनशीपच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.
या अपघातानंतर स्टोक्सने पुढे भरपूर फलंदाजी केली. त्याने ११० चेंडू खेळताना ८२ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने २ षटकार आणि ८ चौकार मारले.
Man down 😬
Ben Stokes is floored after inside edging a Labuschagne short ball into the unmentionables#LVCountyChamp pic.twitter.com/0y3bAxCIBo
— Vitality County Championship (@CountyChamp) May 12, 2022
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स याला नवा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. काहीदिवसांपूर्वीच जो रुटने इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोडले होते. त्यानंतर २८ एप्रिल रोजी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याच्या नावावर नवा नियमित कसोटी कर्णधार म्हणून शिक्कामोर्तब केले आहे.
स्टोक्स (Ben Stokes) इंग्लंडचा ८१ वा नियमित कसोटी कर्णधार (England Test Captain) बनला आहे. त्याच्या नियुक्तीसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन यांनी मंगळवारी संध्याकाळी मान्यता दिली. त्याच्या नावासाठी इंग्लंड पुरुष क्रिकेटचे व्यवस्थापकीय संचालक, रॉब की यांनी शिफारस केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
“आम्ही भारताच्या मागे का पळावे?, त्यांना आमच्या विरोधात खेळायचे असेल तर त्यांनी पाकिस्तानात यावे”
रोहितला पहिल्यांदा भेटल्यावर काय होत्या भावना? तिलक वर्मा म्हणतोय, ‘गळाभेट घ्यायची होती आणि…’