भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात इंग्लंड संघ मजबूत स्थितीत आहे. इंग्लंड संघाने सलग दोन दिवस फलंदाजी करत ८ बाद ५५५ धावा केल्या आहेत. यात कर्णधार जो रूट याच्या द्विशतकिय खेळीचा समावेश आहे. तसेच उपकर्णधार बेन स्टोक्स याच्या ताबडतोड ८२ धावांचा समावेश आहे. उपकर्णधार बेन स्टोक्स याने दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर म्हंटले की, इंग्लंड संघ तिसऱ्या दिवशी जितक्या जास्त धावा करता येतील तितके करू, तसेच इनिंग लवकर घोषित करणार नाही असेही तो म्हणाला.
“लवकर डाव घोषित करणार नाही”
इंग्लंड संघाचा उपकर्णधार बेन स्टोक्स याने दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या समाप्ती नंतर सांगितले की, आम्ही डाव घोषित करण्याचा विचार नाही करत आहोत. पहिल्या डावात जितक्या जास्त धावा करता येतील तितक्या जास्त धावा करू. रविवारी आम्ही आणखीन एक तास फलंदाजी केली तर आम्हाला आनंद होईल.’
पुढे तो म्हणाला, “खेळपट्टीचा इंग्लंड संघ नक्कीच फायदा घ्यायचा विचार करेल. मला असे वाटते की, खेळपट्टीवर स्पिन, बाऊन्स आणि रिव्हर्स स्विंग होत आहे. त्यामुळे माझ्या मते आम्ही खूप चांगले खेळलो आहे. याचे श्रेय आम्हालाच द्यावे लागेल. भारतात अशी फलंदाजी करणे खूप कठीण आहे. ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. आणि आम्हाला या गोष्टीचा फायदा घ्यायला हवा.”
“पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला हरवू”
बेन स्टोक्स जो रुट बद्दल बोलताना म्हणाला, “जो रुट हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजापैकी एक आहे. रुट हा आपल्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना खेळत आहे. आणि आम्ही हा सामना जिंकून त्याला १०० व्या सामन्याची भेट देणार आहोत. आम्हाला माहीत आहे सामना जिंकण्यासाठी आम्हाला भरपूर मेहनत करावी लागणार आहे. रूट याला १०० व्या सामन्याची कॅप मी दिली होती.”
महत्वाच्या बातम्या:
आयएसएल २०२०-२१ : एटीके मोहन बागानकडून ओदीशाचा धुव्वा
राज्य निवडचाचणी कुस्ती स्पर्धेत बीड जिल्ह्यातील पैलवान अमोल मुंढे विजयी! आता गाजवणार पंजाबचं मैदान