---Advertisement---

स्टोकने थेट लपवलं तोंड अन् धरून बसला डोकं, सिडनी कसोटीतील शेवटच्या षटकात असं काय घडलं?

ben-stokes-tension
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs India) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची ऍशेस मालिका (Aahes series) सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत दोन्ही संघांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलिया संघ या सामन्यात विजय मिळवण्यासाठी खेळत होता. तर इंग्लंड संघ पराभव वाचवण्यासाठी अखेर झुंज देत होता. अखेर खालच्या फळीतील फलंदाजांना हा सामना वाचवण्यात यश आले. दरम्यान शेवटच्या षटकात बेन स्टोक्सने( Ben stokes viral video) असे काही केले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सिडनी कसोटीत अनेक उतार चढाव आले. एकवेळ असे वाटत होते की, ऑस्ट्रेलिया संघ या सामन्यात एकहाती विजय मिळवणार. तर असेही वाटत होते की, इंग्लंड संघाला हा सामना अनिर्णीत करण्यात यश येईल. अखेर इंग्लंड संघाला नशीबाची साथ मिळाली आणि हा सामना बरोबरीत सुटला. परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत इंग्लंड संघातील खेळाडूंची धडधड वाढली होती.

व्हिडिओ पाहा-

जोहान्सबर्ग कसोटी तर गमवलीच, पण भारतीय खेळाडूंनी वाद घालत सामन्याला लावल गालबोट | INDvsSA Clashes

सध्या सोशल मीडियावर बेन स्टोक्सचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये बेन स्टोक्स आपला चेहरा लपवताना दिसून येत आहे. तर झाले असे की, ऑस्ट्रेलिया संघाकडून शेवटचे षटक टाकण्यासाठी स्टीव्ह स्मिथ (steve Smith)  गोलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. त्यावेळी इंग्लंडचा शेवटचा फलंदाज जेम्स अँडरसन फलंदाजी करत होता. त्याने या षटकातील सुरूवातीचे ५ चेंडू खेळून काढले. त्यानंतर सहाव्या चेंडूवर तो अडचणीत सापडला होता. जे पाहून, इंग्लंडच्या खेळाडूंची चिंता वाढली होती. ( Ben stokes was seen hiding face in a t shirt in pressure situation)

https://twitter.com/7Cricket/status/1480087456137416704?t=z93wScVT2ZBA5z5SyOt-sA&s=19

तसेच या संघातील दिग्गज अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स इतका घाबरला होता की, त्याने चक्क आपला चेहरा लपवला होता. या षटकातील शेवटचा चेंडू स्टीव्ह स्मिथने बाहेरच्या दिशेने फुल टॉस चेंडू टाकला. जो जेम्स अँडरसनने सहजरीत्या अडवला. यासह इंग्लंड संघातील खेळाडूंच्या जीवात जीव आला. या मालिकेतील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना १४ ते १८ जानेवारी दरम्यान पर्थच्या मैदानावर पार पडणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

सिडनीमध्ये स्मिथचाच बोलबाला! केलीये ‘अशी’ अचाट कामगिरी

केपटाऊन कसोटीत भारतीय खेळाडूंनी केलेल्या ३ अविस्मरणीय कामगिरी, ज्या आजही विसरणे कठीण

हे नक्की पाहा :

सचिनच्या सल्ल्याने पालटली कारकीर्द पण सचिनमुळेच जगभर ट्रोल झालेला Lord Thakur |  Sachin Tendulkar

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---