क्रिकेटविश्वात श्रीलंकेच्या खेळाडूंची चर्चा मागील काही दिवसात मैदानातील कामगिरीपेक्षाही मैदानाबाहेरील गोष्टींमुळे अधिक झाली आहे. काही खेळाडूंनी निवृत्तीची तडकाफडकी घोषणा केली होती. यात ३० वर्षीय भानुका राजपक्षे याचा देखील समावेश होता. पण आता त्याने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. याबद्दल श्रीलंका क्रिकेट बोर्डाने पुष्टी केली आहे.
श्रीलंका क्रिकेटने ५ जानेवारी रोजी राजपक्षे निवृत्त होत असल्याचे सांगितले होते. त्यावेळी त्याने तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेताना कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे कारण दिले होते. त्याने त्याच्या निवृत्तीच्या पत्रात लिहिले होते की, ‘खेळाडू, पती आणि वडील या नात्याने मी माझ्या स्थानाचा काळजीपूर्वक विचार केला आहे आणि वडील म्हणून माझी भूमिका आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या लक्षात घेऊन हा निर्णय घेत आहे.’
याबरोबरच असेही म्हटले जात आहे की, राजपक्षेने श्रीलंकेच्या फिटनेस नियमांना कंटाळून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. असे असले तरी, क्रीडामंत्री नमल राजपक्षे यांनी त्याला विनंती केली होती की, त्याने निवृत्तीच्या निर्णयाचा पुन्हा विचार करवा.
आता भानुका राजपक्षेनेही आपला निर्णय बदलत श्रीलंका क्रिकेटला सोपवलेले निवृत्तीचे पत्र मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिक वाचा – निवृत्ती घेण्यापूर्वी खेळाडूंना बोर्डाला द्यावी लागणार नोटीस, वैतागलेल्या श्रीलंका क्रिकटचे कडक नियम
भानुका राजपक्षेनी श्रीलंकेसाठी ५ वनडे आणि १८ टी२० सामने खेळले आहेत. दोन्ही स्वरुपात मिळून त्यानी दोन अर्धशतकांच्या जोरावर ४०९ धावा केल्या आहेत. २०२१ च्या टी विश्वचषकासाठी तो श्रीलंकेच्या संघाचाही भाग होता. या स्पर्धेत त्यानी श्रीलंकेसाठी ८ सामन्यांत १५५ धावा केल्या होत्या.
व्हिडिओ पाहा – वादापासून आयुष्यभर चार हात लांब राहिलेला Rahul Dravid जेव्हा क्रिकेटप्रेमींच्या डोक्यात गेला होता
श्रीलंकेने केले नवे नियम
गेल्या २ आठवड्यात केवळ राजपक्षेनेच नाही, तर अन्य काही खेळाडूंनीही निवृत्तीची घोषणा केली होती.त्यामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने कठोर नियम करण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीलंका क्रिकेटने नियम केला आहे की, राष्ट्रीय संघातील खेळाडूंना निवृत्तीच्या तीन महिन्यांआधी नोटीस द्यावी लागेल. तसेच विदेशी टी२० लीगमध्ये खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी निवृत्तीनंतर सहा महिन्यांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. एवढेच नाही, तर लंका प्रीमीयर लीगमध्ये खेळण्यासाठी निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंना ८० टक्के देशांतर्गत क्रिकेट सामने खेळावे लागणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
वेस्ट इंडिजमध्ये रंगणार १९ वर्षाखालील विश्वचषकाचा थरार, ‘या’ ५ भारतीय खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष
‘हिटमॅनला बोलवा रे!’, राहुल – मयांकच्या जोडीच्या फ्लॉप शोनंतर नेटकऱ्यांच्या मागणीला जोर