सध्या भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. उभय संघातील टी20 मालिकेतील दुसरा सामना माऊंट मॉन्गुई येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत 65 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात न्यूझीलंडच्या डावातील पहिले षटक टाकताना भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने एक खास कामगिरी नोंदवली.
भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवच्या नाबाद शतकाच्या जोरावर 6 बाद 191 अशी मजल मारलेली. त्यानंतर न्यूझीलंडला एका चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र, भुवनेश्वर कुमार याने त्या अपेक्षांवर पाणी पेरले. त्याने आपल्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर फिन ऍलनला अर्शदीपकरवी झेलबाद केले.
भुवनेश्वर कुमार याने चालू वर्षी टी20 क्रिकेटमध्ये दहाव्यांदा पहिल्या षटकात विरोधी फलंदाजाला बाद करण्यात यश मिळवले. टी20 क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो एकमेव गोलंदाज आहे. या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर ओमानच्या बिलाल खान याचा क्रमांक लागतो. त्याने 2019 मध्ये सहा फलंदाजांना पहिल्या षटकात तंबूचा रस्ता दाखवलेला. तर, श्रीलंकेचा दिग्गज अष्टपैलू ऍंजेलो मॅथ्यूजने 2009 मध्ये पाच वेळा अशी कामगिरी करून दाखवलेली.
या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास भारतीय संघाने प्रथम फलंदाजी मिळाल्यानंतर खराब सुरुवात केली. इशान किशनने 36 धावांचे योगदान दिले. मात्र, त्यानंतर सूर्यकुमार यादवने एकहाती न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत आपले दुसरे आंतरराष्ट्रीय टी20 शतक पूर्ण केले. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर 192 धावांचे आव्हान ठेवले. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघ सपशेल अपयशी ठरला. कर्णधार केन विलियम्सन हाच केवळ न्यूझीलंडसाठी अर्धशतक झळकावू शकला. भारतासाठी दीपक हुडाने सर्वाधिक चार बळी मिळवले.
(Bhuvneshwar Kumar Took Wicket 10th Time In 1st Over In 2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संजूबाबत अश्विनची भविष्यवाणी ठरली खरी! भारताकडून पंतच्या आधी टी20 पदार्पण करूनसुद्धा दुर्लक्षित
रोहित- विराटच्या ‘त्या’ नकोशा विक्रमाच्या यादीत पंतही बसला मांडी घालून, बनला दुसराच खेळाडू