---Advertisement---

भुवनेश्वर कुमार या खेळाडूसाठी बनला कॅमेरामन, पहा व्हिडिओ

On: मंगळवार, एप्रिल 30, 2019 6:55 PM
---Advertisement---

सोमवारी(29 एप्रिल) ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू डेव्हिड वॉर्नरने सनरायझर्स हैद्राबादकडून आयपीएल 2019 मध्ये शेवटचा सामना किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळला आहे. या सामन्यात हैद्राबादने 45 धावांनी विजय मिळवला. हैद्राबादच्या या विजयात वॉर्नरने अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला.

त्याने त्याच्या या अखेरच्या सामन्यात 56 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार मारताना 81 धावांची खेळी करत आयपीएल 2019मधील त्याच्या प्रवासाचा शेवटही आनंददायी केला. या सामन्यानंतर त्याने मुलाखत देताना त्याच्या हैद्राबाद संघातील प्रवासाबद्दल सांगितले आहे.

विशेष म्हणजे यावेळी हैद्रबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार कॅमेरा हताळताना दिसला आहे. भुवनेश्वरने वॉर्नरच्या मुलाखतीचे शूट केले आहे. याचा व्हि़डिओ आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर करण्यात आला आहे.

या मुलाखतीत वॉर्नरने म्हटले आहे की ‘केशरी हा आमच्यासाठी चांगला रंग ठरला आहे. उगवत्या सुर्याचा केशरी पिवळा रंग असतो आणि आपण सन रायझर्स आहोत. इथे खेळताना खूप मस्ती आणि मजा केली. कुटुंबाबरोबरही चांगला वेळ घालवला. अनेक ठिकाणी भेट दिल्या. हैद्राबाद मला आवडते. माझ्यासाठी हैद्राबाद हे दुसरे घर आहे. आशा आहे की पुढील वर्षी पून्हा येथे येईल.’

त्याचबरोबर सनरायझर्स हैद्राबाद संघाच्या संघमालकांचेही आभार मानताना वॉर्नरने म्हटले आहे की ‘मला सनरायझर्स हैद्राबादने दिलेल्या संधीबद्दल मी कृतज्ञ आहे. तसेच चाहत्यांचेही आभार. तूम्ही(चाहते) आमचा कणा आहात. तूम्ही मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन पाठिंबा दिला. यापुढेही हा पाठिंबा देत रहा. आम्हाला सोशल मीडियावरही फॉलो करत रहा.’

वॉर्नरने पुढे त्याच्यासाठी कॅमेरामन बनलेल्या भुवनेश्वर बद्दल म्हटले की ‘भूवीने जे केले ते चांगले केले पण मला वाटते तो मैदानात जास्त चांगला आहे. भूवी हा नवीन चेंडू चांगला हताळतो. तसेच त्याने शेवटच्या षटकांमध्येही चांगली गोलंदाजी केली.’

वॉर्नरसाठी यावर्षीचा आयपीएल मोसम खास ठरला आहे. तो सध्या आयपीएल 2019मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील आहे. त्याने 12 सामन्यात 69.20 सरासरीने 692 धावा केल्या आहेत. यात त्याने 1 शतक आणि 8 अर्धशतके केली आहेत.

पण 2019 विश्वचषकाच्या तयारीसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने विश्वचषकासाठी संघात संधी मिळालेल्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना 2 मेच्या आधी परत मायदेशात बोलावले आहे. त्यामुळे वॉर्नरलाही आयपीएल संपण्यापूर्वीच मायदेशी परतावे लागणार आहे.

वॉर्नर हा या विश्वचषकातून मागील एक वर्षांच्या बंदीनंतर स्टिव्ह स्मिथसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहेत. स्मिथ आणि वॉर्नरवर मागील वर्षी मार्चमध्ये चेंडू छेडछाड प्रकरणामुळे 1 वर्षांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी बंदी घातली होती. पण आता ही बंदी उठली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

विराट कोहलीला मदत करणे ही माझी जबाबदारी – रोहित शर्मा

गे नसल्याचे जेम्स फॉकनरने केले स्पष्ट; त्या फोटोमागील सत्याचाही केला खूलासा

डेव्हिड वॉर्नरचा आयपीएल २०१९ला भावनिक अलविदा…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment