वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा सुरू असतानाच ऑस्ट्रेलियाच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलिया संघाने भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. विश्वचषकानंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी मॅथ्यू वेड याला संघाचा कर्णधार बनवले आहे. तसेच, अनेक दिग्गज खेळाडूंना या मालिकेतून विश्रांती दिली आहे.
ऑस्ट्रेलियाने अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील या 5 टी20 सामन्यांच्या मालिकेला 23 नोव्हेंबरपासून सुरू होईल. सामन्यांच्या ठिकाणांविषयी बोलायचं झालं, तर हे पाच सामने विशाखापट्टनम, तिरुवनंतपुरम, गुवाहाटी, नागपूर आणि हैदराबाद येथे खेळले जाणार आहे.
SQUAD! There's more cricket to come in India next month, with Matthew Wade set to lead this talented bunch in five T20I's against India #INDvAUS pic.twitter.com/Mqc8cLe5Ur
— Cricket Australia (@CricketAus) October 28, 2023
मालिकेतील दुसरा सामना 26 नोव्हेंबर, तिसरा सामना 28 नोव्हेंबर, चौथा सामना 1 डिसेंबर आणि पाचवा सामना 3 डिसेंबर रोजी हैदराबाद येथे खेळला जाणार आहे. (big news australia announce their squad for t20 series against india)
कर्णधारपद वेडकडे
मॅथ्यू वेड याच्या खांद्यावर ऑस्ट्रेलिया संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच, टीम डेविड आणि स्पेन्सर जॉन्सन या खेळाडूंना संघात सामील करण्यात आले आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि तन्वीर संघा हेदेखील या संघाचा भाग आहेत. सलामीवीर म्हणून या संघात डेविड वॉर्नर याचाही समावेश आहे. तसेच, स्टीव्ह स्मिथ आणि मार्कस स्टॉयनिस यांनाही ताफ्यात सामील केले आहे. मात्र, मिचेल मार्श आणि कॅमरून ग्रीन यांना संघातून डच्चू दिला आहे, जो खूपच चकित करणारा निर्णय आहे.
वनडे संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याला विश्रांती दिली आहे. तसेच, जोश हेजलवूड आणि मिचेल स्टार्क यांनाही या मालिकेसाठी संघात घेतले नाहीये. त्यांच्याव्यतिरिक्त सीन ऍबॉट, नेथन एलिस आणि जेसन बेहरेन्डॉर्फ यांना संघात जागा दिली आहे. ऍडम झम्पा हादेखील फिरकीपटू म्हणून संघाचा भाग आहे.
भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ
मॅथ्यू वेड (कर्णधार), जेसन बेहरेन्डॉर्फ, सीन ऍबॉट, टीम डेविड, नेथन एलिस, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, डेविड वार्नर आणि ऍडम झम्पा
हेही वाचा-
पाकिस्तानच्या पराभवानंतर चिडला हरभजन सिंग, थेट आयसीसीला मागणी करत म्हणाला, ‘हा’ नियम बदलाच…
‘आमच्यासाठी दरवाजे…’, सलग चौथ्या निराशाजनक पराभवानंतर Babar Azam भावूक, सहकाऱ्यांबद्दल केलं मोठं विधान