पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो (cristiano ronaldo) याचा एक आकर्षक पुतळा गोव्यामध्ये उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे उद्घाटन मंगळवारी (२८ डिसेंबर) करण्यात आले आहे. पुतळा उभारण्यामागच्या प्रमाणिक हेतू युवकांना त्यापासून प्रेरणा मिळावी असा असला, तरी याबाबत आता वाद निर्माण झाला आहे.
गोव्यामध्ये रोनाल्डोचा हा पुतळा उभारल्यानंतर मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक लोकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. लोकांनी अशी नाराजी व्यक्त केली आहे की, रोनाल्डोच्या जागी स्थानिक दिग्गज फुटबॉपटूंपैकी एकाचा पुतळा लावता येऊ शकत होता. तर काहींना रोनाल्डो पोर्तुगालच्या राष्ट्रीय संघाचा खेळाडू असल्यामुळे देखील त्याला विरोध केला आहे.
मंगळवारी लोकार्पण करण्यात आलेला रोनाल्डोचा हा पुतळा पितळाचा असल्याचे समजते. पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमापासूनच काही लोकांनी यासंदर्भात आंदोलन करायला सुरुवात केली. आंदोलनकर्त्यांनी या पुतळ्याची स्थापना केल्यामुळे काळे झेंडे देखील दाखवले. तसेच राज्याच्या अधिकाऱ्यांनी अर्जुन पुरस्कार विजेते आणि भारताच्या फुटबॉल संघाचे माजी कर्णधार ब्रूनो यांच्यासारख्या स्थानिक फुटबॉलपटूंचा अपमान केल्याचा आरोप देखील आंदोलनकर्त्यांनी केला.
https://twitter.com/MichaelLobo76/status/1475937752512286720?s=20
माध्यामांतील वृत्तानुसार, रोनाल्डोची हा पुतळा गोव्यातील पुणजी शहरात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे वजन जवळपास ४१० किलो ग्रॅम आहे आणि त्याच्या उभारण्यासाठी जवळपास १२ लाख रुपयांचा खर्च आला आहे. मागच्या तीन वर्षांपासून या पुतळ्याचे काम सुरू होते.
स्थानिक भाजपा आमदार मायकल लोबोंनी यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली. त्यांच्या मते रोनाल्डोचा हा पुतळा युवकांना त्यापासून प्रेरणा मिळावी आणि देशातील फुटबॉलला पुढच्या पातळीपर्यंत घेऊन जाण्यासाठी स्थापन केला गेला आहे. पुतळा फक्त प्रेरणा देण्यासाठी लावला गेला आहे, पण सरकारकडून चांगले मैदान, इफ्रास्ट्रक्चर आणि प्रशिक्षक मिळणे गरजेचे असल्याचेही लोबो यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
रणजी ट्रॉफीसाठी तमिळनाडू संघाच्या नेतृत्त्वाची धुरा विजय शंकरकडे, ३ नव्या चेहऱ्यांनाही संधी
व्हिडिओ पाहा –