दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघाचे फलंदाज अपयशी ठरताना दिसत आहेत. गुरुवारी (28 डिसेंबर) भारताला दुसऱ्यांदा फलंदाजीसाठी संधी मिळाली. या डावातरी वरच्या फळीतील फलंदाज स्वस्तात बाद झाले. पण विराट कोहली संयमी खेळी करत असल्यामुळे त्याने संघाचा डाव सावरला. विराटने यादरम्यान त्याने श्रीलंकेचा माजी दिग्गज कुमार संगकारा याचा मोठा विक्रम देखील मोडीत काढला.
विराट कोहली (Virat Kohli) याने गुरुवारी 61 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. ही खेळी करत असताना विराटने 2023 वर्षातील आपल्या 2000 आंतरराष्ट्रीय धावाही पूर्ण केल्या. ही पहिली किंवा दुसरी वेळ नाहीये, जेव्हा विराटने एका वर्षात 2000 धावांचा टप्पा पार केला असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटची ही सातवी वेळ आहे, जेव्हा त्याने 2000 धावांचा टप्पा पार केला आहे. श्रीलंकन दिग्गज कुमार संगकारा आणि विराट कोहली यापूर्वी प्रत्येका सहा वेळा अशी कामगिरी करणारे फलंदाज होते. पण गुरुवारी विराटने संगकाराला मागे टाकत हा विक्रम नावावर केला.
त्याव्यतिरिक्त सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 5 वेळा एका वर्षात 2000 धावांचा टप्पा पार केला होता. यादीत चौथा क्रमांक माहेला जयवर्धने याचा आहे. त्यानंतर येतात जॅक कॅलिस, रिकी पाँटिंग, सौरव गांगुली आणि मॅथ्यू हेडन. या चौघांहीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत प्रत्येकी चार – चार वेळा एका वर्षात 2000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 2000 धावा करणारे खेळाडू
7 – विराट कोहली*
6 – कुमार संगकारा
5 – सचिन तेंडुलकर
5 – माहेला जयवर्धने
4 – जॅक कॅलिस
4 – रिकी पाँटिंग
4 – सौरव गांगुली
4 – मॅथ्यू हेडन
विराट कोहली याने 2012, 2014, 2016, 2017, 2018, 2019 आणि त्यानंतर थेट 2023 मध्ये ही कामगिरी केली. 2020, 2021 आणि 2022 मध्ये विराट कोहली याला अपेक्षित प्रदर्शन करता आले नव्हते. दरम्यानच्या तीन वर्षांमध्ये भारतीय दिग्गज धावा करण्यासाठी अक्षरशः झगडताना दिसला होता.
उभय संघांतील या कसोटी सामन्याचा विचार केला, तर भारतीय संघ अडचणीत दिसत आहे. पहिल्या डावात भारताने 245, तर दक्षिण आफ्रिका संघाने 408 धावा केल्या. दुसरा डाव सुरू होण्याआधी आफ्रिकी संघ 163 धावांनी आघाडीवर होता. दुसऱ्या डावात देखील भारतीय फलंदाज समाधानकारक खेळी करू शकले नाही. संघाची धावसंख्या 13 असताना दोन्ही सलामीवीर बाद झाले. त्यानंतरच्या तीन विकेट्स जाईपर्यंत भारतीय संघ कसाबसा 96 धावांपर्यंत पोहोचला. भारतासाठी हा सामना अनिर्णित करणेही कठीण दिसत आहे. (Boxing Day Test Virat Kohli becomes the first player to complete 2000 runs in 7 calendar years)
पहिल्या कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर, एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, गेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
महत्वाच्या बातम्या –
पहिलं कसोटी शतक करण्याची संधी यान्सेनच्या हातून निसटली! पहिल्या डावाअंती दक्षिण आफ्रिका 163 धावांनी आघाडीवर
‘आता बास कर…’, मॅक्सवेलने षटकारांचा पाऊस पाडताच BBLनेही जोडले हात; पोस्ट Viral