भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा सध्या भारतीय संघाचा भाग नाही. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेत तो संघात स्थान बनवण्यात अपयशी ठरलेला. त्याआधी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टी20 मालिकेत त्याची कामगिरी खराब राहिलेली. त्याने सातत्याने नो बॉल टाकल्यामुळे त्याच्यावर टीकाही करण्यात येत होती. मात्र, आता त्याच्या या कमजोरीविषयी थेट ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यानेच त्याला सल्ला दिला आहे.
अर्शदीप सिंग याने पदार्पण केल्यापासून भारतीय संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली होती. टी20 विश्वचषकात तो भारतासाठी सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज होता. त्यानंतर दुखापतीमुळे तो संघाबाहेर झाला. श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून त्याने पुनरागमन केले होते. मात्र, पुनरागमानाच्या सामन्यात तो केवळ दोन षटके गोलंदाजी करू शकला. यामध्ये त्याने तब्बल 37 धावा खर्च केल्या. विशेष म्हणजे त्याने यात पाच नो बॉल टाकले होते. आपल्या पहिल्या षटकात त्याने सलग तीन नो बॉल टाकण्याची अनोखी हॅट्रिक नोंदवलेली.
त्याच्या या कामगिरीनंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झालेली. त्यानंतर आता ब्रेट लीने त्याला सल्ला देताना म्हटले आहे की,
“त्यावेळी अर्शदीप पुनरागमन करत होता. कोणताही खेळाडू पुनरागमनाच्या सामन्यात काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, शरीराला त्याची लगेच सवय होत नाही. कदाचित याच प्रयत्नात त्याच्याकडून ही चूक घडली. त्याने पुन्हा एकदा नेटमध्ये जाऊन यावर काम केले आणि कोणतेही दडपण न घेता 100 टक्के प्रयत्न करत गोलंदाजी केल्यास, तो पुन्हा पूर्वीप्रमाणे फलंदाजांना अडचणीत आणेल.”
अर्शदीप सध्या रणजी ट्रॉफी मध्ये पंजाब संघासाठी खेळताना दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी तो पुन्हा एकदा भारतीय संघाची जर्सी घालून तयार असेल.
(Brett Lee Advice Arshdeep Singh For His No Ball Mistake)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्टंप्स मागे सोडून स्टीव स्मिथने मारला अनोखा शॉट, चेंडू टाकण्याआधी बॉलरही गोंधळला
केएल राहुलपाठोपाठ अक्षर पटेलही चढणार बोहल्यावर, जाणून घ्या कोण आहे अष्टपैलूची होणारी पत्नी