ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या टी20 महिला विश्वचषकात भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता भारतीय महिला संघाचा 5 मार्चला उपांत्य फेरीत इंग्लंड महिला संघाशी सामना होणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ब्रेट लीने या भारतीय संघामध्ये अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे.
तसेच यामागे 16 वर्षाय शेफाली वर्मा ही एक मोठे कारण असल्याचेही त्याने म्हटले आहे. शेफालीशिवाय अनुभवी लेगस्पिनर पूनम यादवने या स्पर्धेत भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने साखळी फेरीचे चारही सामने जिंकून गटात अव्वल स्थान मिळविले आहे.
आयसीसीने दिलेल्या वृत्तानुसार ब्रेट ली म्हणाला, ‘ते(भारत) कधी अंतिम सामन्यात (टी20 विश्वचषकाच्या) पोहोचले नाहीत. पण पूर्वी पाहिलेल्या भारताच्या संघांपेक्षा हा पूर्णपणे वेगळा भारतीय संघ आहे. त्यांच्याकडे शेफाली वर्मा आणि पूनम यादवसारखे मॅचविनर खेळाडू आहेत. जे सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत.’
‘आपल्या माहित आहे की त्यांच्याकडे जगातील काही सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत. परंतु आता हरमनप्रीत कौरकडे एक असा संघ आहे, जो मोठ्या खेळाडूंना पाठिंबा देऊ शकतो आणि जेव्हा मोठ्या खेळाडूंचा एखादा दिवस वाईट असेल तेव्हा संघातील इतर खेळाडू त्यांची जागा भरुन काढू शकतात,’ असेही ली म्हणाला.
या विश्वचषकात आतापर्यंत शेफालीने आक्रमक खेळताना अनुक्रमे 29 ,39,46 आणि 47 अशा धावा केल्या आहेत. तिचे कौतुक करताना ली म्हणाला, ‘शेफालीने सलामीला फलंदाजी करताना चमकदार कामगिरी केली आहे, तिने भारतीय फलंदाजीत नवी उर्जा आणली आहे आणि तिला असे खेळताना पाहून आम्हाला आनंद झाला.’
तसेच ली म्हणाला, शेफाली आणखी मोठी खेळी करु शकते. तसेच ती विश्वचषकात आता पहिले अर्धशतक करण्यास उत्सुक असेल.
43 वर्षीय ली पुढे म्हणाला, ‘ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापासून आपण पाहत आहोत की भारताने किती चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांनी अ गटात अव्वल क्रमांक मिळवला यात आश्चर्यकारक काहीही नाही.’
महत्त्वाच्या बातम्या-
–कपिल देव म्हणतात, विराटच्या खराब फॉर्मसाठी ही गोष्ट जबाबदार