---Advertisement---

७०० विकेट्स घेणारा गोलंदाज म्हणतो, रोहितला गोलंदाजी; नको रे बाबा

---Advertisement---

भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानले जाते. त्याने आत्तापर्यंत वनडेत ३ द्विशतके करण्याचाही पराक्रम केला आहे. त्यामुळे त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करताना गोलंदाजांचा कस लागतो.

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज ब्रेट लीनेही स्पष्ट केले आहे की त्याला रोहितला गोलंदाजी करण्यास आवडत नाही.

स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट कनेक्टेड शोमध्ये बोलताना ली म्हणाला, ‘तो आक्रमक आहे. पण रोहित शर्माबद्दलची माझी पहिली आठवण ही त्याच्या बॅटचा आवाज आहे. हीच पहिली गोष्ट आहे जेव्हा मी त्याच्याबद्दल विचार करतो तेव्हा डोक्यात येते. जेव्हा बॅटच्या मधोमध चेंडू लागतो तेव्हा एक वेगळा आवाज ऐकू येतो.’

‘तो अशा लोकांपैकी एक आहे जो मानसिकरित्या तयार असतो. जर त्याने एकदा स्वत:ला एखाद्या कठीण परिस्थितीपासून बाहेर काढले की तो त्याच्या लयीत खेळतो.’

तसेच ली पुढे म्हणाला, ‘सुरवातीपासूनच गोलंदाजांवर वर्चस्व गाजवणार्‍या रोहित शर्मासारखे फलंदाज जेव्हा वरच्या फळीमध्ये असतात तेव्हा मला अशा फलंदाजांना गोलंदाजी करायची इच्छा होत नाही. रोहित नक्कीच त्याच फलंदाजांच्या वर्गातील आहे.’

रोहितने २००७ ला जेव्हा सीबी सिरिजमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी केली होती, तेव्हा त्याने पहिल्यांदा लीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामना केला होता. त्यावेळी लीच्या वेगाच्या विचाराने रोहितला रात्री झोपही लागली नव्हती. याचा खूलासा रोहितने क्रिकेट कनेक्टेड शोमध्येच केला.

त्याला त्याने सामना केलेल्या कठीण वेगवान गोलंदाजाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी रोहित म्हणाला, ‘त्यातील एक गोलंदाज ब्रेट ली आहे. कारण त्याच्यामुळे मी २००७ ला माझ्या पहिल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या आदल्या रात्री झोपू शकलो नव्हतो. मी त्यावेळी विचार करत होतो की या गोलंदाजाला कसा खेळू, जो १५० किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी करत आहे.’

‘२००७ ला ब्रेटली त्याच्या सर्वोत्तम लयीत होता. मी त्याला जवळून पहायचो आणि मी निरिक्षण केले होते की तो सातत्याने १५० ते १५५ किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी करत होता. त्यावेळी माझ्यासारख्या युवा क्रिकेटपटूसाठी अशा प्रकारच्या वेगाचा सामना करण्याचा विचार म्हणजे झोप उडण्यासारखेच होते.’

ब्रेट लीने त्याच्या कारकिर्दीत ७१८ विकेट्स घेतल्या आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी – 

शांत पुजाराला ट्रोल करणं विराटला पडलं भलतंच महागात, पुजाराने घेतला…

लाॅकडाऊनमध्ये सराव करणे खेळाडूंना पडले महागात, लोकांनी केले…

अदृश्य होण्याची शक्ती मिळाली तर हा क्रिकेटपटू लाॅकडाऊनमध्ये येणार धोनीच्या घरी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---