इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही संघ एकमेकांवर वरचढ ठरत आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. तर दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमाल करत पुनरागमन केले.
भारतीय संघ पहिल्या डावात इंग्लंडच्या १८३ धावांचा पाठलाग करत होता. याच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने ९५ धावांची आघाडी घेत २७८ धावा बनविल्या. ज्यात केएल राहुलने सर्वाधिक ८४ धावा केल्या. तसेच जडेजाने अर्धशतकीय खेळी करत त्याला साथ दिली.
दरम्यान, शेवटच्या फळीत फलंदाजी करण्यासाठी आलेल्या जसप्रीत बुमराहचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतो आहे. ज्यात बुमराहने पुलशॉट मारत एक षटकार लगावून दिला. बुमराहच्या या शॉटला क्रिकेट प्रेमींनीकडून खूप पसंत केले जात आहे.
बुमराहने सॅम करनच्या गोलंदाजीवर एका चौकारानंतर लगेचच पुलशॉटवर षटकार मारला. पहिल्या डावात बुमराहने ३४ चेंडूत २८ धावा केल्या, जी त्याची आतापर्यंतची सर्वाधिक वयक्तिक धावसंख्या आहे. बुमराहच्या अशा आक्रमक खेळीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तसेच सोशल मीडियावर देखील त्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.
Sam Curran gets the taste of his own medicine 😋
Bumrah smashes 3 consecutive boundaries 🔥Tune into Sony Six (ENG), Sony Ten 3 (HIN), Sony Ten 4 (TAM, TEL) & SonyLIV (https://t.co/AwcwLCPFGm ) now! 📺#ENGvINDOnlyOnSonyTen #BackOurBoys #JaspritBumrah pic.twitter.com/XgaSYxOf21
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 6, 2021
दरम्यान, भारतीय संघाने पहिल्या डावात २७८ धावा करत इंग्लंडवर ९५ धावांची आघाडी मिळवली होती. पण दुसऱ्या डावात इंग्लंडने चांगली कामगिरी करत कर्णधार जो रुटच्या १०९ धावांच्या शतकी खेळीसह ३०३ धावा केल्या आणि भारतासमोर २०९ धावांचे आव्हान विजयासाठी ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवसाखेर १ बाद ५२ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे बुमराहने केवळ फलंदाजीतच नाही, तर गोलंदाजीतही मोलाचे योगदान दिले. त्याने दोन्ही डावात मिळून ९ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
–जसप्रीत बुमराहची फलंदाजी विराट कोहलीसाठी ठरली डोकेदुखी; भारतीय कर्णधार होतोय प्रचंड ट्रोल
–…म्हणून इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात चांगली कामगिरी करु शकलो, केएल राहुलचा खुलासा
–“माझे नाव पुन्हा जगासमोर आणण्यासाठी श्रीजेशचे आभार”