आयपीएल २०२० च्या हंगामासाठी चीनी मोबाईल कंपनी विवोने मुख्य प्रायोजक म्हणून करार रद्द केला होता. त्यानंतर असे म्हटले जात होते की आयपीएलला आता भारतीय टायटल प्रायोजक मिळेल. १८ ऑगस्टला आयपीएलला नवीन प्रायोजक मिळाला. परंतु यांमध्ये चीनी कंपन्यांची गुंतवणूक आहे. अशामध्ये बीसीसीआयविरुद्ध पुन्हा आवाज उठवला जात आहे.
खरं तर व्यापारी संघटना कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कैट) बुधवारी (१९ ऑगस्ट) बीसीसीआयला एक पत्र लिहून आयपीएलच्या मुख्य प्रायोजकात चीनी गुंतवणूकदारांचा सहभाग असल्याचा निषेध केला. कैटने बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले की, “आम्हाला हे जाणून खूप वाईट वाटत आहे की आता ड्रीम ११ला आयपीएल २०२० च्या प्रायोजकत्वाच्या रूपात निवडले आहे. ज्यांमध्ये चीनी कंपनी टेन्सेन्ट ग्लोबल प्रमुख भागधारकांपैकी एक आहे.
कैटने ड्रीम ११ ला आयपीएलचे मुख्य प्रायोजकाचे अधिकार देण्याबाबत म्हटले की, “आम्ही या बाबतीत विचार करत आहोत की, ड्रीम ११ ला प्रायोजकत्व देणे आणखी काहीही नसून, चीनविरुद्ध भारतातील लोकांच्या भावनांकडे दुर्लक्ष्य करणे आहे. कैट चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करत आहे.”
पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती. त्यानंतर भारतात चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकला जात आहे.
काय आहे ड्रीम ११ शी चीनचे संबंध?
कैटचा असा विश्वास आहे की, ड्रीम ११ ऑपरेट करणारी स्पोर्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मुंबईची आहे. परंतु स्टिडीव्ह्यू कॅपिटल आणि टेन्सेन्ट होल्डिंग्जने ही गुंतवणूक केली आहे. या दोन्ही कंपन्या चीनमधील आहेत, ज्यांनी ड्रीम ११ शिवाय भारतातील बायजूस, फ्लिपकार्ट, ओला आणि हाईक यांसारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. अशा परिस्थितीत आयपीएलच्या मुख्य प्रायोजकांचे चीनी संबंध पुन्हा एकदा समोर आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–इंडियन प्रीमियर लीग २०२०चा ड्रीम लोगो तुम्ही पाहिलाय? पहा कसा दिसतोय हा नवाकोरा लोगो
-रोहित- धोनीचे फॅन आहात? तर ही आहे सर्वात मोठी खुशखबर
-सीपीएलमध्ये शिमरोन हेटमायरचे वादळ; सलग दुसऱ्यांदा तुफानी अर्धशतक ठोकत संघाला मिळवून दिला विजयी
ट्रेंडिंग लेख-
-रोहित शर्मासह या ५ खेळाडूंना मिळणार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
-आयपीएल२०२० : आरसीबीच्या या ३ खेळाडूंना कदाचित मिळणार नाही एकाही सामन्यात खेळण्याची संधी
-आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना फ्लॉप ठरलेले ३ टी२० क्रिकेटमधील दिग्गज