आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (ICC Champions Trophy 2025) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) संघात समावेश करण्यात आला आहे. बुमराह भारतीय संघाचा भाग आहे, पण त्याच्या तंदुरुस्तीबद्दल प्रश्न कायम आहेत. दरम्यान आता कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) बुमराहबद्दल एक धक्कादायक विधान केले.
रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, “आम्हाला अद्याप जसप्रीत बुमराहबद्दल पूर्णपणे खात्री नाही, त्यामुळे अर्शदीप सिंगला संघात समाविष्ट करण्यात आले आहे.” याशिवाय, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनीही बुमराहच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिले.
मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीबद्दल सांगितले की, “आम्ही जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीची वाट पाहत आहोत आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळेल.”
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा
जसप्रीत बुमराहच्या आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी वनडेत 2018 मध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने भारतासाठी 89 वनडे सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 88 डावात गोलंदाजी करताना 149 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 19 धावात 6 विकेट अशी आहे. तर इकाॅनाॅमी 4.59 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Champions Trophy; ‘या’ 3 कारणांमुळे मोहम्मद सिराजला भारतीय संघातून वगळले
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आतापर्यंतचे विजेते, सर्वाधिक वेळा स्पर्धा कोणी जिंकली?
बीसीसीआयच्या नवीन नियमांवर कर्णधार रोहित शर्माने उठवले प्रश्न..! म्हणाला…