क्रिकेटविश्वात अनेक खेळाडू असे आहेत, ज्यांचे खेळाविषयी असलेले समर्पण दिसून येते. असेच काहीसे 3 दिवसांपूर्वी लंका प्रीमिअर लीगमध्ये घडले होते. एका खेळाडूचे 4 दात तुटले होते. त्याला तब्बल 30 टाके लागले होते. तरीही त्याने पुनरागमन करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या या समर्पणामुळे त्याला प्रत्येकजण सलाम ठोकत आहे. हा खेळाडू इतर कुणी नसून चमिका करुणारत्ने आहे. झेल घेण्यादरम्यान चमिका करुणारत्ने चार दात तुटले होते. त्याची गंभीर दुखापत पाहून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे सर्जरी झाल्यानंतर त्याचे चार दात बसवले गेले. या घटनेच्या तीन दिवसांनंतर आता याच खेळाडूने आपल्या संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे.
श्रीलंकन खेळाडू चमिका करुणारत्ने (Chamika Karunaratne) लंका प्रीमिअर लीग (Lanka Premier League) स्पर्धेत कँडी फाल्कन्स (Kandy Falcons) संघाकडून खेळत आहे. त्याच्या संघाने शनिवारी (दि. 10 डिसेंबर) एका सामन्यात जाफना किंग्स (Jaffna Kings) संघाला पराभूत केले. करुणारत्ने हा फाल्कन्स संघाच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने फलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही आपला दम दाखवून दिला.
सामन्याचा आढावा
या सामन्यात जाफना किंग्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 147 धावा कुटल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कँडी फाल्कन्सने सामना 3 विकेट्सने आपल्या नावावर केला. मात्र, हा विजय त्यांच्यासाठी सोपा नव्हता.
Match 06 – KF VS JK Match Summary. What a fantastic play-off at the end by the Kandy Falcons.
–
Tickets @daraz_lk
Title Sponsor @maza_play Powered by @1xbatsportinglines Powered by @fairplay_news Presented by @skyexch Hydration Partner American Premium Water
⁰-
⁰#LPL2022 pic.twitter.com/aEnQPOA3Pm— LPL – Lanka Premier League (@LPLT20) December 10, 2022
करुणारत्नेने जिंकून दिला सामना
जाफना संघाने दिलेल्या 148 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कँडी फाल्कन्स संघाने चांगली सुरुवात केली नव्हती. संघाने 100 धावांच्या आतच 6 विकेट्स गमावल्या होत्या. यावेळी संघ अडचणीत असल्याचे दिसत होते. मात्र, करुणारत्ने 15व्या षटकात फलंदाजीसाठी उतरला. त्याने पहिल्या चेंडूवर दमदार चौकार मारत आपला इरादा स्पष्ट केला होता. त्याच्या संघाला शेवटच्या 5 षटकात विजय मिळवण्यासाठी 43 धावांची आवश्यकता होती. मात्र, पहिल्या दोन षटकात फाल्कन्स संघाने फक्त 9 धावाच केल्या. आता शेवटच्या 3 षटकात फाल्कन्स संघाला 34 धावांची गरज होती. मात्र, 18व्या षटकात फक्त 3 धावा निघाल्या. त्यामुळे 12 चेंडूत फाल्कन्स संघाला 31 धावांची गरज होती. यानंतर अशेन बंडारा आणि करुणारत्ने यांनी विस्फोटक फलंदाजी करत 13 धावा केल्या. या षटकात बंडारा रिटायर्ट आऊट झाला.
शेवटच्या षटकात फाल्कन्स संघाला विजयासाठी 16 धावांची गरज होती. करुणारत्नेने पहिल्या दोन चेंडूवर षटकार मारला आणि सामना पालटला. शेवटच्या चेंडूवर त्याने संघाला शानदार विजय मिळवून दिला. करुणारत्ने याने यादरम्यान 162च्या स्ट्राईक रेटने 16 चेंडूत 26 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून देऊनच पव्हेलियनमध्ये परतला. यादरम्यान त्याने सामन्यादरम्यान दोन झेलही घेतले. (chamika karunaratne lost teeths 3 days back now helped kandy falcons win over jaffna kings in lpl)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढलेल्या पोटामुळे लाईव्ह सामन्यात पंचांवर मान खाली घालण्याची वेळ, बाबर आझमने काय केले पाहाच
महिने 18, अध्यक्ष 4! ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये नक्की काय सुरूये?