इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा उर्वरित हंगाम सुरू होण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. संयुक्त अरब अमिरातीतील दुबई येथे १९ सप्टेंबरपासून मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने राहिलेल्या हंगामाचा शुभारंभ होणार आहे. या सामन्यांसाठी दोन्हीही संघ युएईला पोहोचले असून त्यांनी सरावाला सुरुवात देखील केली आहे. अशात नुकतेच चेन्नई संघाच्या टीम बसचे फोटो पुढे आले आहेत.
प्रत्येक फ्रँचायझी आपल्या संघातील खेळाडूंच्या जर्सीपासून ते टीम बसपर्यंत सर्व गोष्टींवर खूप खर्च करत असतात. प्रत्येक फ्रँचायझीची बस ही त्यांच्या रंगात रंगवलेली असते आणि त्यावर खेळाडूंचे फोटोही असतात. खेळाडू आणि संघातील इतर सदस्य विश्रांतीसाठी थांबलेल्या हॉटेलपासून ते स्टेडियमपर्यंतच्या प्रवासासाठी या बसचा वापर केला जातो.
चेन्नई संघाची नवी टीम बससुद्धा पूर्णपणे पिवळ्या रंगामध्ये रंगवली आहे. यावर एका बाजूने कर्णधार एमएस धोनी, सुरेश रैना, शार्दुल ठाकूर, ड्वेन ब्रावो, फाफ डू प्लेसिस आणि दीपक चाहरचे चित्र रेखाटलेले आहे. तर बसच्या दुसऱ्या बाजूवर अष्टपैलू रविंद्र जडेजा, मोईन अली, सॅम करन, ऋतुराज गायकवाड आणि इमरान ताहिर यांची चित्रे दिसत आहेत. त्यांच्या बाजूला चेन्नई संघाचा सिंहाच्या आकारातील लोगोही आहे. तसेच चेन्नईची स्थानिक भाषा तमिळमध्येही काहीतरी लिहिलेले आहे.
Chennai Super Kings' team bus for the IPL 2021 in the UAE. pic.twitter.com/GD0Kku74cJ
— Tanuj Singh (@ImTanujSingh) August 19, 2021
अशाप्रकारे चेन्नई संघाप्रमाणेच त्यांची अप्रतिम टीम बससुद्धा दुबईत सज्ज झाली आहे. सोशल मीडियावर चेन्नई संघाच्या टीम बसचे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल होताना दिसत आहेत.
CSK Team bus in UAE, Get ready to roar…#WhistlePodu #MSDhoni #CSK #Raina pic.twitter.com/EscyM3XV2X
— லாவண்யா (@lavanya0102) August 20, 2021
CSK's Team bus 🤩💛#WhistlePodu • @ChennaiIPL • #IPL2021 pic.twitter.com/jG7JL9r8pW
— Suresh Raina FC™ (@CultRaina) August 19, 2021
दरम्यान एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली पहिल्या टप्प्यात चेन्नई संघाने दमदार प्रदर्शन केले होते. हंगामातील पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी अश्विसनीय पुनरागमन केले. पहिल्या टप्प्यात ७ पैकी ५ सामने जिंकत १० गुणांसह हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. हीच लय कायम राखत यंदा चौथ्या जेतेपदावर आपले नाव कोरण्याचा चेन्नई संघाचा उद्देश्य असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
आता माझी सटकली! विराटने इशारा करताच मोहम्मद सिराजने ‘सिंघमचे’ रूप केले धारण, पाहा व्हिडिओ
बटलर राजस्थान संघातून बाहेर; न्यूझीलंडच्या ‘या’ यष्टीरक्षक फलंदाजाला मिळाली बदली खेळाडू म्हणून संधी