इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ चा उर्वरित हंगाम सुरू होण्यासाठी केवळ एका महिन्याचा कालावधी उरला आहे. १९ सप्टेंबरपासून युएई येथे आयपीएलचे राहिलेले सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेला चेन्नई सुपर किंग्ज संघ (सीएसके) आतापासूनच आयपीएलच्या तयारीला लागला आहे. पुढील आठवड्यात सीएसके संघ युएईला रवाना होणार आहे. तत्पुर्वी संघातील खेळाडू चेन्नई येथे एकत्र जमायला सुरुवात झाली आहे.
सीएसकेचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड रविवार रोजी (०८ ऑगस्ट) चेन्नईला पोहोचला आहे. सीएसकेने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटद्वारे ऋतुराजच्या आगमनाची माहिती दिली आहे. त्याचा चेन्नईत पोहोचलेला फोटो सीएसकेने ट्वीटरवर पोस्ट केला आहे. नुकतेच ऋतुराजने श्रीलंकाविरुद्ध टी२० सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
ऋतुराजबरोबर संघ सहकारी केएम असीफही चेन्नईत पोहोचला आहे. तसेच सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीदेखील लवकरच चेन्नईला रवाना होणार असल्याचे समजत आहे.
RG31 Landed 🥳#HomeSweetDen #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/DUypx6cyrI
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) August 8, 2021
Sliding in Powli Style 💥#HomeSweetDen #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/jpjeeOZERF
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) August 8, 2021
हाय व्होल्टेज सामन्याने होणार सुरुवात
जैव सुरक्षित वातावरणात कोरोनाच्या शिरकावानंतर २९ सामन्यांनंतर आयपीएलचा चौदावा हंगाम स्थगित करावा लागला होता. यानंतर आता शिल्लक ३१ सामने १९ सप्टेंबरपासून युएईच्या दुबई, शारजाह आणि अबु धाबीच्या स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. तर १५ ऑक्टोबर रोजी अंतिम सामना रंगणार आहे.
सीएसकेची नजर चौथ्या जेतेपदावर
धोनीच्या नेतृत्त्वाखाली सीएसके संघाने आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात चमकदार कामगिरी केली आहे. त्यांनी पहिल्या टप्प्यात ७ सामने खेळले असून त्यापैकी ५ सामने जिंकले आहेत. तर २ सामन्यांत त्यांना पराभवास सामोरे जावे लागले आहे. अशाप्रकारे १० गुणांची कमाई करत सीएसके संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. उर्वरित हंगामातही हीच लय कायम राखत चौथ्यांदा चषक जिंकण्याचा सीएसके संघाचा इरादा असणार आहे. त्यांनी आतापर्यंत २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये आयपीएल जेतेपद पटकावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कोच राहुल द्रविड बनले ‘कन्नड टिचर’, चक्क ब्रिटिश उच्चायुक्ताला दिले धडे; व्हिडिओ तूफान व्हायरल
WTC पाँईट टेबल: पहिली कसोटी अनिर्णीत राहिल्याने टीम इंडियाचे ‘मोठे’ नुकसान, वाचा सविस्तर
बुमराहविषयी विचारलेला प्रश्न ऐकून चकित झाला राहुल; म्हणाला, ‘सर, मला माहिती नाही’