आयपीएल 2023 (IPL 2023) साठी सर्व संघांनी आपापल्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने देखील आयपीएलच्या या आगामी हंगामासाठी कायम ठेवलेल्या तसेच करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली. कर्णधार एमएस धोनी यांच्यासह 18 खेळाडूंना रिटेन करण्याचा निर्णय सीएसके संघव्यवस्थापनाने घेतला.
Whistles. Roars. Anbuden🤩
Super Returns ⏳#WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/PPB5wjCEVE— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 15, 2022
आयपीएल 2023 साठी खेळाडू रिटेन करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर होती. सर्व संघांनी आपापल्या कायम ठेवलेल्या व करार मुक्त केलेल्या खेळाडूंची नावे घोषित करताना अनेक आश्चर्याचे धक्के दिले. चार वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलेल्या सीएसकेने 18 खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये कर्णधार एमएस धोनीसह अंबाती रायुडू, ऋतुराज गायकवाड, दीपक चहर, रविंद्र जडेजा व शिवम दुबे या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. सीएसकेने विदेशी खेळाडू मोईन अली, मिचेल सॅंटनर व डेवॉन कॉनवे यांना देखील कायम राखण्याचा निर्णय घेतला.
Sending all the Yellove! We will cherish the moments we whistled as you roared in the middle! We Yellove You, Singams! 🦁💛#WhistlePoduForever
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 15, 2022
सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झालेला भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा व वेस्ट इंडिजचा महान अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो यांना देखील करारमुक्त करण्याचा निर्णय सीएसके संघव्यवस्थापनाने घेतला. नुकतेच इंग्लंड संघासह टी20 विश्वविजेतेपद जिंकलेल्या ख्रिस जॉर्डन याला देखील सीएसकेने आपल्या संघात कायम केले नाही. मागील तीन वर्षापासून संघाचा भाग असलेले केएम आसिफ व एन जगदिशन हे देखील आगामी हंगामात चेन्नईचा भाग नसतील.
सीएसकेने कायम राखलेले खेळाडू-
एमएस धोनी, रवींद्र जडेजा, डेवॉन कॉनवे, मोईन अली, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, अंबाती रायुडू, ड्वेन प्रिटोरियस, महिश तिक्षणा, प्रशांत सोलंकी, दीपक चहर, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे, राजवर्धन हंगारगेकर, मिचेल सॅंटनर, सुभ्रांशु सेनापती व मथिश पथिराणा.
सीएसकेने करारमुक्त केलेले खेळाडू-
रॉबिन उथप्पा, ड्वेन ब्राव्हो, केएम आसिफ, ऍडम मिल्ने, एन जगदिशन, हरिनिशांत, भगत वर्मा व ख्रिस जॉर्डन.
(Chennai Super Kings Retained And Released Players For IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केन विलियम्सनने ‘या’ भारतीय गोलंदाजाबद्दल काढले गौरोद्गार, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
‘ही’ गोष्ट बदला, कर्णधार बदलून काय होणार, टीम इंडियाला इरफान पठाणचा सल्ला
आयपीएल 2023 आधी मुंबईने या खेळाडूंना दिला नारळ; रोहितच्या नेतृत्वात हे 15 शिलेदार कायम