नवी दिल्ली । चेन्नईच्या कार्तिक थरानी व राघुल रंगासामी यांनी जे के टायर एफएमएसीआय नॅशनल रेसिंग अजिंक्यपद स्पर्धेत युरो जेके 2018 आणि एलजीबी फॉर्म्युला 4 याचे जेतेपद मिळवले. 35 हजार फॅन्सच्या उपस्थितीत युरो जेकेची सुरुवात चांगली झाली. थरानी आणि मुंबईच्या नयन चॅटर्जी यांमध्ये 89 गुणांसह बरोबरीत होती. त्यामुळे निकाल हा शेवटच्या 10 लॅप्समध्ये लागला.
नयन व कार्तिक यांच्यात पी सिक्स आणि पी फाईव्हमध्ये चुरस पहायला मिळाली.नयनला सुरुवातीलाच दुस-या लॅपमध्ये अडथळ्याचा सामना करावा लागला. त्याची कार मानव शर्माच्या कारला आढळली.या संधीचा फायदा कार्तिकने उचलत रेससोबतच चॅम्पियनशिप देखील आपल्या नावावर केली. नयनला दुस-या स्थानी समाधान मानावे लागले.तर, अश्विन दत्ताला निराशाजनक कामगिरीसह तिस-या स्थानी रहावे लागले.
एलजीबी फॉर्म्युला 4 मध्ये गतविजेता विष्णू प्रसादकडे सर्वांचे लक्ष होते.त्याच्याकडे सहा गुणांची आघाडी होती. पण, रेसच्या मध्यंतराला तो मागे पडला. त्यामुळे त्याचा संघ सहकारी राघुल रंगासामीला संधी मिळाली. याचा त्याने चांगला फायदा घेत दुसरे स्थान मिळवले.त्याचा फायदा त्याच्या चॅम्पियनशिपमध्ये झाला. विष्णूला फक्त एक गुण मिळाला.त्यामुळे राघुलला जेतेपद मिळाले.
मी अजिंक्यपद कसे पटकावले हे मला माहित नाही.मी पिट्सवर आल्यावरच मला कळाले. नॅशनल चॅम्पियन असल्याची भावना ही वेगळीच असते असे राघुल पत्रकार परिषदेत म्हणाला. दिल्लीच्या रोहित खन्नाने तिसरे स्थान मिळवले. आयझॉलचा माल्सावाडावंग्लिआना याने सुझुकी गिक्सर कपमध्ये विजय मिळवला. त्याने संयुक्तरित्या दुसरे स्थान मिळवले. चेन्नईचा जोसेफ मॅथ्युने जेतेपद मिळवले . विशेष म्हणजे या फेरीत त्याला चमक दाखवता आली नाही तरीही त्याने जेतेपद मिळवण्यात यश आले.
माल्सावाडावंग्लिआनाने रोड रेसच्या आशिया कप स्पर्धेत विजय नोंदवला. विशेष म्हणजे त्याने आशियाच्या बाईकर्स मागे टाकले. ऑस्ट्रेलियाचा मॅक्स स्टॉफर आणि श्रीलंकेचा हंसिका अबयसिंघे यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले. नवी दिल्लीच्या गुरविंदर सिंग व जयपूरच्या विजय सिंग यांनी जेके सुपरबाईक कपमध्ये 1000 सीसी ते 600 सीसी गटात बाजी मारली.
जेकेएनआरसी अजिंक्यपद स्पर्धा :
– युरो जेके 2018 : 1) कार्तिक थरानी 2) नयन चॅटर्जी 3) अश्विन दत्ता
– एलजीबी 4 : 1) राघुल रंगासामी 2) विष्णू प्रसाद 3) रोहित खन्ना
– गिक्सर कप : 1) जोसेफ मॅथ्यु 2) माल्सावाडावंग्लिआना 3) सय्यद मुझम्मिल अली
दुसरा दिवस
– युरो जे के 2018 (रेस 3) : 1) नयन चॅटर्जी 2) कार्तिक थरानी 3) आर्य सिंग
– युरो जे के 2018 (रेस 4) : 1) कार्तिक थरानी 2) यश आराध्य 3) ब्रायन पेरेरा
– एलजीबी 4 (रेस 3) :1) रोहित खन्ना 2) राघुल रंगासामी 3) संदीप कुमार
– एसीआरआर : 1) माल्सावाडावंग्लिआना 2) मॅक्स स्टॉफर 3) हनिका अबेयसिंघे
– गिक्सर कप : 1) माल्सावाडावंग्लिआना 2) सचिन चौधरी 3) संजीव म्हात्रे
– जे के सुपरबाईक्स कप 600 सीसी : 1) विजय सिंग 2) कुलवंत सिंग 3) सरनबीर सिंग
– जे के सुपरबाईक्स कप 1000 सीसी ; 1) दिलीप लालवानी 2) दिपक रवी कुमार 3) गुरविंदर सिंग
महत्त्वाच्या बातम्या:
–कबड्डीपटूच्या जिद्दीला सलाम, अपंगत्व असतानाही कबड्डी खेळणारा महारथी
–टी२० मालिका सुरू होण्यापुर्वी ही आकडेवारी तुम्हाला नक्की माहित हवीच
–पुढच्या ४८ तासांनी रोहितचे नाव टी२०मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार
–नाद कॅच! ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच
–अशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल
–त्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर!