---Advertisement---

आयपीएलमध्ये ‘यूनिवर्स बॉस’ ख्रिस गेलच आहे सिक्सर किंग…

On: शनिवार, मार्च 30, 2019 7:15 PM
---Advertisement---

मोहाली। आज(30 मार्च) आयपीएल 2019 मधील नववा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाब समोर 177 धावांचे आव्हान ठेवले आहे.

या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने तुफानी सुरुवात केली आहे. त्याने 24 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 40 धावांची खेळी केली. तसेच एक खास विक्रमही रचला आहे.

गेलने आयपीएलमध्ये 300 षटकारांचा टप्पा पार केला आहे. आयपीएलमध्ये हा टप्पा पार करणारा तो पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू आहे. विशेष म्हणजे असून गेल व्यतिरिक्त अन्य कोँणत्याही फलंदाजाला 200 षटकारांचा टप्पाही आयपीएलमध्ये अजून ओलांडता आलेला नाही.

गेलला या सामन्याआधी 300 षटकारांचा टप्पा ओलांडण्यासाठी 2 षटकारांची आवश्यकता होती. त्याचे आता आयपीएलमध्ये 115 सामन्यात 302 षटकार झाले आहेत.

आज त्याला कृणाल पंड्याने बाद केले. त्याचा झेल हार्दिक पंड्याने घेतला. तत्पूर्वी मुंबईकडून क्विंटन डिकॉकने 60 धावांची अर्धशतकी खेळी केली.यात त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. तसेच हार्दिकने 19 चेंडूत 31 धावांची छोटीखानी तुफानी खेळी केली. त्यामुळे मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 176 धावा केल्या.

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू –

302 – ख्रिस गेल (115 सामने)

192 – एबी डिविलियर्स (143 सामने)

187 – एमएस धोनी (177 सामने)

186 – सुरेश रैना (178 सामने)

185 – रोहित शर्मा (176 सामने)

178 – विराट कोहली (165 सामने)

महत्त्वाच्या बातम्या – 

रोहित शर्माला नाबाद असतानाही डीकॉकमुळे परतावे लागले पॅव्हिलियनमध्ये, पहा व्हिडिओ

Video: शतकी खेळी करणारा सॅमसन वॉर्नरला म्हणाला, ‘तू माझा दिवस खराब केलास’

गोलंदांजाना जमले नाही, पण एका पिझ्झाबॉयने थांबवला होता संजू सॅमसनचा धूमाकूळ, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment