हैद्राबाद | काल हैद्राबाद विरुद्ध पंजाब सामन्यात हैद्राबादने १३ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. यावेळी ख्रिस गेलने काही काळासाठी विकेट किपींगची भुमिका निभावली होती.
केएल राहुलने थोड्या वेळाची विश्रांती घेतल्याने ख्रिस गेल त्याचे ग्लोव्ज घेऊन विकेट किपींगसाठी उभा राहिला होता. तेव्हा गेलने गोलंदाज बरिंदर स्रानला चेंडू टाकण्यास सांगितले. तेवढ्यातच राहुल बाऊंड्रीच्या दोरीपासून पळत आला आणि गेलने त्याला हसत त्याचे ग्लोव्ज परत केले.
Gayle – the wicketkeeperhttps://t.co/yXpK5092kJ
— Faizal Khan (@faizalkhanm9) April 26, 2018
यावर्षीच्या आयपीएलमध्ये गेल चांगलाच फॉर्ममध्ये आहे. खेळाडूंच्या लिलावात मात्र या कॅरेबियन क्रिकेटरला कोणीच बोली लावली नव्हती. सुरूवातीचे काही सामने न खेळलेल्या गेलने चेन्नईविरूध्दच्या सामन्यात तडाखेबाज फंलदाजी केली होती.
त्याने आत्तापर्यंत चार सामने खेळले असून २५२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने हैद्राबादविरूध्द केलेल्या नाबाद १०४ धावांचा समावेश आहे. हे यावर्षीच्या आयपीएलमधील पहिले शतक ठरले.
पंजाब सध्या गुणतालिकेत १० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या संघाने ७ सामने खेळले असून त्यातील ५ जिंकले तर २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
काल झालेल्या सामन्यात पंजाबला दुसऱ्यांदा पराभूत व्हावे लागले. हैद्राबादने २० षटकात केलेल्या १३३ धावांचा पाठलाग करताना पंजाब ११९ धावांतच गारद झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
–आयपीएल होणारच, पण भारतात नाही तर या देशात!
–आयपीएलमध्ये पहिल्यांदाच जुळून आला असा योगायोग
–भारतीय संघातील या दोन मित्रांचं मराठीतील संभाषण नक्की पहा
–कसोटी क्रिकेट चाहत्यांसाठी हे आहे नाराज करणारे वृत्त
– सामना पराभूत झाला म्हणून काय झाले, त्याने जिंकली चाहत्यांची मने
–टाॅप ७- आयपीएलमध्ये या खेळाडूंनी अर्ध्यातच सोडले कर्णधारपद, संघाचे पुढे काय झाले पहाच
–आमदार चषक कबड्डी स्पर्धेत एअर इंडिया सलामीलाच कोलमडली