---Advertisement---

टीम इंडियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी या १४ खेळाडूंचा झाला विंडीजच्या संघात समावेश

On: शनिवार, जुलै 27, 2019 3:37 PM
---Advertisement---

भारतीय संघ पुुढिल महिन्यात विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात 3 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामने होणार आहेत. यातील वनडे मालिकेसाठी विंडीज क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी 14 जणांचा विंडीजचा संघ जाहिर केला आहे.

या वनडे मालिकेसाठी आक्रमक सलामीवीर फलंदाज ख्रिस गेलचा विंडीजच्या संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच डावकरी सलामीवीर फलंदाज जॉन कॅम्बेललाही संधी मिळाली आहे. त्याचबरोबर अष्टपैलू क्रिकेटपटू किमो पॉलचाही 14 जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

तसेच रोस्टन चेस, शिमरॉन हेटमेयर, शाय होप, निकोलस पुरन या फलंदाजांचाहीविंडीजच्या संघात समावेश आहे. त्याचबरोबर कार्लोस ब्रेथवेट हा अष्टपैलू खेळाडूही संघात असून ओशान थॉमस, शेल्डन कॉट्रेल, फॅबियन ऍलेन, केमार रोच या गोलंदाजाचा समावेश आहे.

ही वनडे मालिका टी20 मालिकेनंतर 8 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. पहिला वनडे सामना 8 ऑगस्टला गयाना आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर होईल. तर दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 11 आणि 14 ऑगस्टला त्रिनिदादला होईल. त्याआधी 3 ते 6 ऑगस्टदरम्यान टी20 मालिका पार पडले.

ही वनडे मालिका ख्रिस गेलची शेवटची वनडे मालिका असल्याचे बोलले जात आहे. तो या मालिकेनंतर निवृत्ती घेणार असल्याची चर्चा आहे. गेलने आत्तापर्यंत वनडेमध्ये 298 वनडे सामन्यात 37.93 च्या सरासरीने 10393 धावा केल्या आहेत.

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा विंडीजचा 14 जणांचा संघ –

जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, जॉन कॅम्पबेल, एव्हिन लुईस, शाय होप, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन, रोस्टन चेस, फॅबियन ऍलन, कार्लोस ब्रेथवेट, कीमो पॉल, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, केमार रोच.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

अखेर मोहम्मद शमीला या देशात जाण्याचा व्हिजा मिळाला

तब्बल दिडवर्षांनंतर त्या तिन्ही क्रिकेटपटूंचे झाले ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात पुनरागमन

नॉट आऊट असतानाही पॅव्हेलियनमध्ये परतला युवराज सिंग, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment