लिजेंड्स लीग क्रिकेटचा दुसरा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. यावर्षी स्पर्धेत एकूण चार संघ खेळताना दिसतील. या फ्रँचायझी क्रिकेट लीगसाठी नुकताच खेळाडूंचा ड्राफ्ट पार पडला. भारतात ही स्पर्धा १६ सप्टेंबरनंतर चार शहरांमध्ये खेळवली जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले अनेक दिग्गज क्रिकेटपटू यात खेळताना दिसणार आहेत. आता या लीगसाठी सर्व संघांची अंतिम यादी जाहीर झाली आहे. मात्र यानंतरही आता वेस्ट इंडीजचा दिग्गज सलामीवीर ख्रिस गेल याचेदेखील नाव या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंत जोडले गेले.
दुसऱ्यांदा होत असलेल्या या लीगमधील गुजरात जायंट्स संघामध्ये गेलता समावेश केला गेला आहे. जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी स्पोर्ट्सलाईनने गुजरात फ्रॅंचाईजी विकत घेतली असून, भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग संघाचे नेतृत्व करेल. स्पर्धेच्या नियमानुसार, खेळाडूंच्या ड्राफ्टनंतर संघाकडे अपेक्षित पर्स उपलब्ध असेल तर, ते तीन दिवसात खेळाडूंना करारबद्ध करू शकतात. त्याच नियमाचा फायदा घेत गुजरातने गेलला आपल्या संघात सामील करून घेतले.
The super smasher, universe boss @henrygayle joins #GujaratGiants! Witness some gigantic action from the legend in #LegendsLeagueCricket.#BossLogonKaGame #BossGame #LLCT20 pic.twitter.com/izzJ1ZhQa0
— Legends League Cricket (@llct20) September 4, 2022
गेलला टी20 चा दिग्गज मानला जातो. दोन वेळचा टी20 विश्वविजेता असलेला गेल जगातील अनेक टी20 लीगमध्ये खेळत असतो. गेलने अधिकृतरित्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली नसली तरी, मागील टी20 विश्वचषकानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाही.
लीगमधील चारही संघांचे कर्णधार भारतीय आहेत. गुजरात जायंट्सचा कर्णधार वीरेंद्र सेहवाग असेल. त्याचबरोबर इंडिया कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद गौतम गंभीरकडे सोपवण्यात आले आहे. हरभजन सिंग मणिपाल टायगर्सचा कर्णधार असेल. तर इरफान पठाणची भिलवाडा किंग्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गुजरात जायंट्स-
वीरेंद्र सेहवाग (कर्णधार), पार्थिव पटेल, ख्रिस गेल अजंता मेंडिस, मनविंदर बिस्ला, अशोक डिंडा, लेंडल सिमन्स, डॅनियल व्हेटोरी, केविन ओ’ब्रायन, स्टुअर्ट बिन्नी, मिचेल मॅक्लनघन एल्टन चिगुंबुरा, ख्रिस ट्रेमलेट, रिचर्ड लेव्ही, जोगिंदर शर्मा, ग्रॅम स्वान.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
साधेभोळे राहुल द्रविड S**y शब्द उच्चारायला लाजले! पत्रकार परिषदेतील व्हिडिओ तुफान व्हायरल
‘भारत डरपोक, शारजाहमध्ये खेळायला घाबरते’; महामुकाबल्यापूर्वी पाकिस्तानमधून इंडियावर आरोप
‘आम्ही पाकिस्तानची खूप धुलाई…’, कट्टर विरोधकांशी पुन्हा भिडण्यापूर्वी राहुल द्रविडने घेतली फिरकी