सध्या इंग्लंडमध्ये द हंड्रेड लीग सुरू आहे. या स्पर्धेत खेळाडूंच्या विस्फोटक फलंदाजीचे दर्शन घडत आहे. फक्त पूर्णवेळ फलंदाजच नाहीत, तर गोलंदाजही बॅटमधून अविश्वसनीय कामगिरी करताना दिसत आहेत. असेच काहीसे द हंड्रेड लीगमधील पाचव्या सामन्यात पाहायला मिळाले. यावेळी साऊदर्न ब्रेव्ह संघाचा स्टार खेळाडू ख्रिस जॉर्डन याने आपल्या वादळी फलंदाजीतून सर्वांच्या भुवया उंचावल्या. चला तर, त्याच्या कामगिरीविषयी जाणून घेऊयात…
द हंड्रेड (The Hundred) लीगमधील पाचवा सामना शुक्रवारी (दि. 04 ऑगस्ट) साऊथम्प्टन मैदानावर साऊदर्न ब्रेव्ह विरुद्ध वेल्श फायर (Southern Brave vs Welsh Fire) संघात पार पडला. हा सामना साऊदर्न ब्रेव्ह (Southern Brave) संघाने 2 धावांनी जिंकला. या विजयाचा शिल्पकार ख्रिस जॉर्डन (Chris Jordan) ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
ख्रिस जॉर्डनचा धमाका
या सामन्यात वेल्श फायर (Welsh Fire) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय साऊदर्न ब्रेव्ह संघाच्या फलंदाजांनी सपशेल चुकीचा ठरवला. यावेळी ब्रेव्ह संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 100 चेंडूत 8 विकेट्स गमावत 147 धावांचा पाऊस पाडला. संघासाठी जॉर्डन चमकला. यावेळी ख्रिस जॉर्डन 32 चेंडूत 70 धावा (Chris Jordan score 70 Runs In 32 balls) करण्यात यशस्वी झाला. यावेळी तो नाबाद राहिला, हे विशेष. या खेळीत त्याने तब्बल 7 षटकारांचाही पाऊस पाडला. त्याच्याव्यतिरिक्त सलामीवीर फिन ऍलेन (21) सोडला, तर एकानेही 20 धावांचा आकडा पार केला नाही.
Chris Jordan, take a bow 👊
A performance of 70 runs from just 32 balls, including 7 sixes 😲#TheHundred pic.twitter.com/Z2nqWBzaJF
— The Hundred (@thehundred) August 4, 2023
वेल्श फायर संघाकडून यावेळी गोलंदाजी करताना हॅरिस रौफ चमकला. त्याने 20 चेंडू गोलंदाजी करताना 27 धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक 3 विकेट्स नावावर केल्या. इतर चार गोलंदाजांना प्रत्येकी 1 विकेट घेण्यात यश आले.
वेल्श फायरचे तोकडे प्रयत्न
ब्रेव्ह संघाच्या 148 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना फायर संघाचे प्रयत्न तोकडे पडले. त्यांना 100 चेंडूत 7 विकेट्स गमावत 145 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना ब्रेव्ह संघाने 2 धावांनी आपल्या नावावर केला. फायर संघाकडून स्टीफन एस्कीनाझी आणि डेविड विली यांनी प्रत्येकी सर्वाधिक 31 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज खास कामगिरी करू शकले नाहीत.
यावेळी साऊदर्न ब्रेव्ह संघाकडून गोलंदाजी करताना क्रेग ओव्हर्टन, टायमल मिल्स आणि रेहान अहमद यांनी शानदार गोलंदाजी करत प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, जॉर्ज गार्टन यानेही 1 विकेट नावावर केली. (chris jordan hit 70 runs in just 32 ball with 7 sixes Southern Brave team won by 2 runs)
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! स्टार खेळाडू क्रिकेटमधून निवृत्त, 2 दिवसात 3 धुरंधरांनी ठोकला क्रिकेटला रामराम
डेब्यू गाजवल्यानंतर तिलकने सांगितले आपले स्वप्न, म्हणाला, “या निळ्या जर्सीमध्ये देशासाठी…”