---Advertisement---

आजोबा, मुलगा व नातू अशा तीन पिढ्या क्रिकेट खेळलेल्या घरातील नातवाची गोष्ट

---Advertisement---

जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड या वेगवान दुकलीने गेले दीड दशक आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले आहे. या दोघांच्या सोबतीला अनेक वेगवान गोलंदाज येऊन गेले मात्र हे दोघे अजूनही इंग्लंड संघाचे तारणहार आहेत. त्यांना साथ दिलेल्या गोलंदाजांपैकी एक गोलंदाज असा होता, जो आपल्या ६ फूट ७ इंच इतक्या उंचीने समोरच्या फलंदाजाच्या मनात धडकी भरवत. नैसर्गिकपणे लाभलेल्या उंचीला वेगवान चेंडूंची आणि त्यातही धोकादायक बाऊन्सरची जोड असलेला ट्रेमलेट अस्सल वेगवान गोलंदाज होता. खेळपट्टी वेगवान नसली तरीही ख्रिस त्याच्या उंचीमुळे बाऊन्सर टाकण्यात यशस्वी होत.

ट्रेमलेटने १२ कसोटी व १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे ५० व १५ बळी आपल्या नावे केले. प्रथमश्रेणी क्रिकेटचा विचार केला तर त्याने १३३ सामन्यांत ४२८ बळी घेतले.

आज याच ख्रिस ट्रेमलेटविषयी आपण १० रंजक गोष्टी जाणून घेऊयात

१) ख्रिस ट्रेमलेटमध्ये क्रिकेट अनुवंशिकतेने आले होते. त्याचे आजोबा मॉरिस ट्रेमलेट यांनी १९४० आणि १९५० च्या दशकात सॉमरसेट आणि इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होते. तर त्याचे वडील टिम ट्रॅमलेट हे हॅम्पशायरचे माजी वेगवान गोलंदाज आहेत. त्यांनीच संपूर्ण कारकीर्दीत ख्रिसला प्रशिक्षण दिले होते.

२) ६ फूट ७ इंच उंची लाभलेला ट्रेमलेट क्रिकेटच्या इतिहासातील पाचवा सर्वात उंच खेळाडू आहे. त्याच्याआधी, या यादीत मोहम्मद इरफान (७’१”), जोएल गार्नर (६’८”), पीटर जॉर्ज (६’८”), बॉयड रॅन्कीन (६’८”) यांचा क्रमांक लागतो.

३) हॅम्पशायरसाठी काही उत्तम कामगिरी केल्यावर त्याची २०००-०१ मध्ये इंग्लंडच्या एकोणीस वर्षाखालील संघात भारत दौर्‍यासाठी निवड झाली. ट्रेमलेटच्या प्रभावी कामगिरीमुळे २००१-०२ च्या हंगामात रॉड मार्शच्या अकादमीत त्याला स्थान मिळाले.

४) ख्रिस ट्रेमलेटने अनुक्रमे २००० आणि २००१ मध्ये एनबीसी डेनिस कॉम्पटन पुरस्कार जिंकला. हा पुरस्कार इंग्लंड क्रिकेट वर्तुळातील, उदयोन्मुख युवा खेळाडूला दिला जातो.

५) २००५ मध्ये बांगलादेशविरूद्ध ट्रेंटब्रिज येथे पदार्पणाच्या वनडे सामन्यात त्याला हॅट्रिक घेण्यात थोडक्‍यात अपयश आले. हॅट्रिक चेंडूवर एक अतिशय विचीत्र गोष्ट घडली. चेंडू यष्ट्यांवर आदळला परंतु दुर्दैवाने बेल्स पडल्या नाहीत.

६) २००७ मध्ये जेव्हा ट्रेमलेटने भारताविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले तेव्हा, आजोबा व नातू यांनी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट खेळणारा तो चौथा खेळाडू ठरला. त्यापूर्वी, जॉर्ज व डीन हेडली, जहांगीर व बाजीद खान, विक रीचर्डसन व चॅपल बंधूं या आजोबा नातवाच्या जोड्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्या होत्या.

७) त्याच्या कारकिर्दीतील सर्वात अविस्मरणीय क्षण २०१०-११ मधील ऍशेस दरम्यान आला. तेथे त्याने ३ कसोटी सामन्यांत १७ बळी घेतले आणि २४ वर्षांच्या दुष्काळानंतर इंग्लंडला ऑस्ट्रेलियात ऍशेस जिंकण्यास मदत केली.

८) २०१३-१४ ऍशेस नंतर केवीन पीटरसनला इंग्लंड संघातून वगळल्यानंतर, ट्रेमलेट पीटरसनच्या समर्थनार्थ आला होता. त्याने, उघडपणे पीटरसन काही चुकीचा वागला नाही असे निक्षून सांगितले.

९) ट्रेमलेटच्या क्रिकेट कारकिर्दीत सतत होणार्या दुखापतींनी महत्वाची भूमिका निभावली. त्याला बर्‍याचदा गुडघा व पाठीच्या दुखापतीमुळे त्रास सहन करावा लागला होता. अखेरीस त्याने ऑगस्ट २०१५ रोजी निवृत्तीची घोषणा केली.

महत्त्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष: वयाच्या तिशीतच आयर्लंडचा दिग्गज झालेला ‘पॉल स्टर्लिंग’
बड्डे स्पेशल: ६० च्या दशकातील वेस्ट इंडिज संघाचे संकटमोचक बसील बूचर
मराठीत माहिती- क्रिकेटर मोहम्मद शमी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---