---Advertisement---

हार्दिक आणि वीवीएस लक्ष्मणकडून फलंदाजांना मिळाला ‘हा’ सल्ला, प्रशिक्षकांनी स्वतः दिली माहिती

On: गुरूवार, नोव्हेंबर 17, 2022 10:09 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिका शुक्रवार, 18 नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर खेळला जाईल. टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ उपांत्य सामन्यात पराभूत झाले आणि विश्वचषक विजयाचे त्यांचे स्वप्न भंग पावले. अशात शुक्रवारी सुरू होणारी टी-20 मालिका दोन्ही संघांसाठी महत्वाची असेल. मालिका सुरू होण्यापूर्वी प्रशिक्षक वीवीएल लक्ष्मण यांनी माथ्यमांशी बोलताना त्यांनी फलंदाजांना दिलेला सल्ला सांगितला. 

माध्यमांशी बोलताना वीवीएल लक्ष्मण (VVS Laxman) म्हणाले की, “मी आधीही सांगितले आहे की, टी-20 क्रिकेटमध्ये निडर होऊन खेळणे गरजेचे असते. सुदैवाने आमच्याकडे असे फलंदाज देखील आहे, ज्यांच्याकडे अशी गुणवत्ता आहे आणि खेळपट्टीवर जाऊन स्वतःला सादर करून शकतात. कर्णधार हार्दिक पंड्या आणि मी फलंदाजांना हाच संदेश दिला आहे की, जाऊन निर्भीडपणे खेळा. पण सामन्याची परिस्थिती पाहून रणनीती देखील बनवावी लागेल. सर्वजण अनुभवी आहेत. हो, आपले नियमित सलामीवीर रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली नाहीयेत. पण ज्या खेळाडूंची निवड झालीये, ते देखील खूप आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. खासकरून टी-20 क्रिकेट त्यांनी जास्त खेळले आहे.”

दरम्यान, रोहित, विराट आणि केएल राहुल यांच्या अनुपस्थिती भारताच्या युवा खेळाडूंना या दौऱ्यासाठी संघात सामील केले गेले आहे. उभय संघांतील टी-20 मालिकेत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) संघाचे नेतृत्व करणार असून एकदिवसीय मालिकेत शिखर धवन संघाच्या कर्णधाराची भूमिका पार पाडेल. एवढेच नाही संघाच्या नियमित सपोर्ट स्टाफला देखील न्यूझीलंड दौऱ्यात विश्रांती दिली गेली आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षर राहुल द्रविड आणि त्यांचा सपोर्ट स्टाफ विश्रांतीवर असताना एनसीए प्रमुख वीवीएल लक्ष्मण मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणार आहेत. एनसीएचा सर्व सपोर्ट स्टाफ सध्या भारतीय संघासोबत न्यूझीलंमध्ये आहे. (Coach VVL Laxman revealed what advice Hardik Pandya gave to the batsmen)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाने विश्वविजेत्यांना चारली धूळ, पहिल्या वनडेत इंग्लंडचा दारूण पराभव
विराटच्या तिसऱ्या जागेचा प्रश्न मिटवण्यासाठी ‘हे’ 3 धुरंधर सज्ज, वादळी खेळीने पाडू शकतात धावांचा पाऊस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---