इंग्रजांच्या जवळपास २०० वर्षे गुलामगिरीतून भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. काल म्हणजे १५ ऑगस्ट २०२०ला भारताला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने एकीकडे भारतवासी सामाजिक अंतर राखून आपापल्या पद्धतीने आनंद साजरा करत होते. तर, दूसरीकडे भारतीय क्रिकेट संघातील २ दिग्गज एमएस धोनी आणि सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत चाहत्यांना चकित केले.
धोनी आणि रैनाने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन सर्वांना निवृत्तीची माहिती दिली. त्यामुळे इथून पुढे दोघेही आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाच्या पिवळ्या जर्सीमध्ये तर दिसतील. पण चाहत्यांना त्यांना भारतीय संघाच्या निळ्या जर्सीमध्ये पाहायला मिळणार नाही.
विशेष म्हणजे, धोनी आणि रैनाने घेतलेल्या निवृत्तीचा खूप गजब योगायोग जुळला आहे. ज्याविषयी स्वत: चाहत्यांनी सोशल मिडियावर ट्विट करायला सुरुवात केली. हा योगायोग असा की, काल भारताला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे पूर्ण झाली आहेत. कालच ७ हा जर्सी क्रमांक असणाऱ्या भारताचा माजी कर्णधार धोनीने आणि जर्सी क्रमांक ३ असणाऱ्या अष्टपैलू खेळाडू रैनाने निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघातील ७ आणि ३ म्हणजे एकत्रित ७३ हे जर्सी क्रमांक असणारे खेळाडू निवृत्त झाले आहेत.
७३व्या स्वातंत्र्यदिनाचा आणि ७३ या भारतीय जर्सी क्रमांकाचा हा गजब योगायोग चाहत्यांनी हेरला. ही फॅक्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Coincidence Of 73 Years Independence And Dhoni-Raina 73 Jersey Number
धोनी आणि रैनाने मिळून भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. धोनीने २००४ साली त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती, तर रैनाने २००५ मध्ये भारतीय क्रिकेट संघात पाऊल ठेवले होते. धोनी आणि रैनाने मिळून वनडेत ७३ डावात ३५८५ धावांची भागिदारी केली होती. यात त्यांच्या ९ शतकांचा आणि १८ अर्धशतकांचा समावेश होता. तर, दोघांनी मिळून टी२० क्रिकेटमध्ये २१ डावात २वेळा अर्धशतकी खेळी करत ५४९ धावांची भागिदारी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीची ज्या गिलख्रिस्टशी कायम तुलना झाली; तोही भावुक होतं म्हणतोय, मित्रा…
तामिळनाडूचे लोकं कधीच धोनीला विसरणार नाहीत, तो रिटायर झाल्यानंतरही…
का ‘कॅप्टनकूल’ने निवृत्तीसाठी निवडली ७.२९ ही वेळ? घ्या जाणून कारण
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमधील हे १० विक्रम आहेत केवळ एमएस धोनीच्याच नावावर
५ असे गोलंदाज, ज्यांनी धोनीला करु दिल्या नाहीत शेवटच्या ओव्हरमध्ये धावा
जीवनातील या ८ महत्त्वाच्या गोष्टी, ज्या धोनीकडून आहेत शिकण्यासारख्या