Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रिझवान खेळणार 40 ओव्हर? भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल तोंडाला येईल ते बोलला ‘मारो मुझे मारो’ कॉमेडियन

October 23, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Momin-Saqib

Photo Courtesy: Instagram/mominsaqib


टी20 विश्वचषकातील ज्या सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत, तो सामना लवकरच सुरू होणार आहे. हा सामना दुसरा-तिसरा कुठला नसून भारत- पाकिस्तान सामना आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड या सामन्यासाठी सज्ज झाले आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी मेघराजा बरसण्याची शक्यता अजूनही कायम आहे. मात्र, इतर दिवसांच्या तुलनेत वातावरण स्वच्छ आहे. अशात अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, दोन्ही देशांच्या चाहत्यांसोबत जगभरातील क्रिकेटप्रेमी या सामन्याचा आनंद लुटतील. यादरम्यान भारत आणि पाकिस्तानचे चाहते मोठ्या संख्येने आपल्या देशाला पाठिंबा देण्यासाठी मेलबर्नला पोहोचले आहेत. यामध्ये पाकिस्तानचा कॉमेडियन मोमिन साकिब यानेही हजेरी लावली.

‘मारो मुझे मारो’ (Maro Mujhe Maro) फेम कॉमेडियन मोमिन साकिब (Comedian Momin Saqib) याने शनिवारी (दि. 22 ऑक्टोबर) एक मजेशीर मुलाखत दिली, ज्यात तो म्हणाला की, भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामना सर्व सामन्यांपेक्षा शानदार आहे. विशेष म्हणजे, त्याने यावेळी ही खात्रीही व्यक्त केली की, भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये पाऊस रोडा घालणार नाही.

एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत साकिब बोलताना दिसला. तो म्हणाला की, “ऑस्ट्रेलिया खूप दूर आहे. जर आम्ही इतक्या लांब आलोय, तर तुम्ही त्या उत्साहाचा अंदाज लावू शकता, जो स्पर्धेसाठी आहे. हा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आहे, तेव्हा पूर्ण ऊर्जा, लाईमलाईट या सामन्यावर आहे, हा सामना सर्व सामन्यांपेक्षा शानदार आहे.”

#WATCH | Pakistani comedian Momin Saqib’s hilarious interview ahead of India, Pakistan clash in ICC World T20, in Melbourne, Australia pic.twitter.com/szszOrtjWX

— ANI (@ANI) October 23, 2022

पुढे बोलताना तो म्हणाला की, “चाहत्यांना चिंता होती की, पावसामुळे सामन्यात व्यत्यय येईल. मी त्यांना म्हणालो की, चला बादली घेऊन येऊया. पाऊस जरी आला, तरी आपण पाणी जमा करू आणि मैदानाबाहेर फेकू. तुम्ही वातावरण पाहा, सूर्य दिसतोय, इतके ड- जीवनसत्व. जर पाऊस आला, तर आम्ही पाणी जमा करू.” यावेळी मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याच्याबद्दल बोलताना म्हणाला की, “रिझवानसोबत खूप प्रार्थना आहेत. मला वाटते, तो या सामन्यात 40 ओव्हर खेळेल.”

मागील विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध 10 विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. याची चिंता अजूनही भारतीय चाहत्यांना सतावतेय. अशात पहिल्यांदा विश्वचषकात कर्णधार म्हणून मैदानावर पाऊल ठेवणाऱ्या रोहित शर्मा याला या सामन्यात विजयाची अपेक्षा असेल, यात शंका नाही.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 23 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी जवळपास 1 लाखांहून अधिक चाहते मैदानात हजर असणार आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान वेगळाचं! भारतावर पडलायं भारी, एकदा आकडेवारी पाहाच
‘त्यांनी चांगली गोलंदाजी केली’, अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर त्यांच्या बॉलर्सचे बटलरकडून कौतुक


Next Post
Rohit-Sharma-And-Babar-Azam

नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, यष्टीरक्षक म्हणून डीकेची संघात एन्ट्री; पाहा प्लेइंग इलेव्हन

Photo Courtesy: Twitter/ICC

अर्शदीपचे नाव इतिहासाच्या पानावर! विश्वचषकातील पहिल्याच चेंडूवर बाबरला धाडले 'गोल्डन डक'वर तंबूत

_Shimron Hetmyer

चाहते पत्नीला ट्रोल करू लागल्यामुळे शिमरन हेटमायर निराश, सोशल मीडिया पोस्टमधून झाला व्यक्त

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143