सेंट ल्युसिया | कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये २४ आॅगस्टला झालेल्या सामन्यात गयाना अॅमेझाॅन वाॅरियर्सवर सेंट ल्युसिया स्टार्सने ६ विकेट्सने विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी केलेल्या गयाना अॅमेझाॅन वाॅरियर्सने २० षटकांत ९ बाद १४० धावा केल्या. हे लक्ष घेऊन मैदानात आलेल्या सेंट ल्युसिया स्टार्सने हे लक्ष १८.१ षटकांत पार करताना मोठा विजय मिळवला.
शेवटच्या तीन षटकांत ३१ धावांची गरज असताना पोलार्डने तुफानी फटकेबाजी केली. यात त्याने १८ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या. यात त्याने ३ षटकार आणि ४ चौकार खेचले. त्याचा स्ट्राईक रेट हा २२७.७८ चा होता.
देवेंद्र बीशुच्या सामन्यातील १८व्या षटकात तर पोलार्डने चक्क ३० धावा केल्या. यात ३ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता.
याच स्पर्धेतील ९व्या सामन्यात पोलार्डने एकाच षटकात ३२ धावा दिल्या होत्या तर १५व्या सामन्यात एकप्रकारे याची परतफेड केली आहे.
POLLARD the beast!! What an innings from this legend and hence he takes the title for #Playoftheday #CPL18 pic.twitter.com/KuQPCL4fA2
— CPL T20 (@CPL) August 25, 2018
सेंट ल्युसिया सध्या ७ सामन्यात २ विजय आणि ५ पराभवांसह शेवटच्या स्थानी आहे. या स्पर्धेत एकुण ६ संघ खेळत आहेत. त्यामुळे कालचा हा विजय सेंट ल्युसियासाठी अतिशय महत्त्त्वाचा होता.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-टॉप-५: या खेळाडूंच्या नावावर आहेत शतकांपेक्षा जास्त ‘०’ धावा
– ८२ वर्षांत जे कुणालाही जमले नाही ते विराट ब्रिगेडला करण्याची संधी
– भारताचा फुटबॉलपटू केरळ महापूरग्रस्तांसाठी झाला स्वयंसेवक
–केदार जाधव आणि आंबाती रायडूचा भारताच्या संघात समावेश
–एशियन गेम्स: 28 वर्षांनंतर इराण कबड्डी संघाने जिंकले सुवर्णपदक
–एशियन गेम्स: रोइंगमध्ये भारताला एक सुवर्णपदक तर 2 कांस्यपदक