भारतीय संघाचा स्टार सलामी फलंदाज शिखर धवनने आज (24 ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय तसेत देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. जवळपास 14 कारकीर्द संपवून धवन आता आपल्या आयुष्याचा दुसरा डाव खेळायला तयार आहे. मात्र, धवन आयपीएल खेळत राहणार की नाही याविषयी चाहत्यांमध्ये अजूनही संभ्रम आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही आयपीएल खेळणारे अनेक क्रिकेटपटू आहेत, याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे एमएस धोनी. धवन आयपीएल खेळणार की नाही याचं गुपित त्याच्या व्हिडिओमध्ये दडलं आहे.
शिखर धवनने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे जाहीर केले. मात्र त्यामध्ये गब्बरने कोठेही अस म्हणाला किंवा उल्लेख केला नाही को तो आयपीएल खेळणार नाही. आश्या स्थितीत तो पुढच्या वषी नक्कीच आयपीएल खेळणार असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.
As I close this chapter of my cricketing journey, I carry with me countless memories and gratitude. Thank you for the love and support! Jai Hind! 🇮🇳 pic.twitter.com/QKxRH55Lgx
— Shikhar Dhawan (@SDhawan25) August 24, 2024
शिखर धवनच्या आयपीएल करिअर सर्वात मोठी प्रश्न उपस्थितीत होत आहे. ते म्हणजे पंजाब किंग्ज त्याला आगमी हंगामासाठी रिटेन करणार का? धवन मागील हंगामात पंजाब किंग्जचा कर्णधार होता. पण स्पर्धेच्या मध्यमात त्याला दुखापतीमुळे उर्वरीत सामन्यातून त्याला मुकावे लागले होते. त्याच्या अनुउपस्थितीत सॅम करनने संघाचे कर्णधारपद सांभाळले होते.
धवन आता 38 वर्षाचा झाला आहे. त्याचे वय आणि फिटनेस लक्षात घेता पंजाब किंग्ज त्याला संघात ठेवण तसं कठीणच आहे. संघ त्याच्या जागी युवा खेळाडूवर गुंतवणूक कररण्याचे प्रयत्न करेल. तर या परिस्थिती आशा आपेक्षा गब्बर मेगा लिलावात भाग घेण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत त्याला कोणता संघ खरेदी करणार हे पाहणे बाकी आहे. यावेळी मेगा लिलाव असल्याने 3-4 खेळाडूंना कायम ठेवल्यानंतर सर्व 10 संघांना पुन्हा आपली टीम तयार करावी लागणार आहे.
हेही वाचा-
आलिशान घर, महागड्या गाड्या; शिखर धवन कोट्यावधी संपत्तीचा मालक, पाहा नेटवर्थ
10 वर्ष मोठ्या महिलेशी लग्न केलं, छळाचं कारण देत घटस्फोट घेतला! खूपच वेदनादायी आहे शिखर धवनची लव्ह स्टोरी
विराट-रोहित नाही तर हा स्टार टीम इंडियाचा ‘कोहिनूर हिरा’, दिग्गज क्रिकेटपटूनं केलं काैतुक