भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेत रविवारी (दि. 05 नोव्हेंबर) आपला आठवा सामना खेळत आहे. या सामन्यात भारतापुढे दक्षिण आफ्रिका संघाचे आव्हान आहे. उभय संघ कोलकाता येथील ऐतिहासिक इडन गार्डन्स येथे आमने-सामने आहेत. या सामन्यात भारताने 300 पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभारला. यावेळी विराट कोहली शतक ठोकत अखेरपर्यंत नाबाद राहिला. त्याच्या या शानदार खेळीमुळे खास विक्रमाची नोंदही झाली. तो सचिननंतर असा विक्रम करणारा दुसराच भारतीय ठरला.
विराट कोहली (Virat Kohli) रविवारी (दि. 05 नोव्हेंबर) आपला 35वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा सामना खूपच खास आहे. अशात या सामन्यात त्याने 121 चेंडूंचा सामना करताना 101 धावांची नाबाद शतकी खेळी केली आहे. त्याच्या खेळीत 10 चौकारांचा समावेश होता. या शतकासोबतच त्याने भारतात वनडे क्रिकेटमध्ये खेळताना 6 हजार धावांचाही टप्पा पार केला. त्याने 119 सामन्यातील 116 डावांचा सामना करताना 60.46च्या सरासरीने 6046 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून भारतात 23 शतके निघाली आहेत.
𝗛𝗨𝗡𝗗𝗥𝗘𝗗 in Kolkata for the Birthday Boy! 🎂🥳
From scoring his Maiden century in Kolkata to scoring his 4⃣9⃣th ODI Ton 👑💯#TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #INDvSA pic.twitter.com/pA28TGI4uv
— BCCI (@BCCI) November 5, 2023
विराट कोहली हा सचिन तेंडुलकर याच्यानंतर जागतिक क्रिकेटमधील असा दुसराच फलंदाज आहे, ज्याने मायदेशात वनडे क्रिकेटमध्ये 6 हजार किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. सचिनने 164 वनडे सामन्यातील 160 डावात भारतात खेळताना 48.11च्या सरासरीने 6976 धावा केल्या आहेत. यामध्ये 20 शतकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky Ponting) हा यादीत तिसऱ्या स्थानी आहे. मात्र, त्याला 6 हजार धावांचा टप्पा गाठता आला नाही. त्याने 153 सामन्यातील 150 डावात 5406 धावा केल्या आहेत.
विराट कोहलीची विश्वचषकातील कामगिरी
विराट कोहली याच्या विश्वचषक 2023 स्पर्धेतील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर तो खूपच शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत 8 सामने खेळले असून त्यात 108.40च्या सरासरीने 542 धावा केल्या आहेत. विराटच्या बॅटमधून यादरम्यान 2 शतकांचाही पाऊस पडला. यासह तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. 545 धावांसह क्विंटन डी कॉक अव्वलस्थानी आहे.
दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 327 धावांचे आव्हान
या सामन्यात भारतीय संघाने विराटच्या शतकाच्या आणि श्रेयस अय्यर (77) याच्या अर्धशतकाच्या जोरावर 50 षटकात 5 विकेट्स गमावत 326 धावांचा पाऊस पाडला. तसेच, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 327 धावांचे आव्हान दिले आहे. आता दक्षिण आफ्रिका हे आव्हान पार करते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरत आहे. (cricket world cup 2023 virat kohli becomes 2nd indian complete 6000 runs in india odi)
हेही वाचा-
अवघ्या आठ डावांमध्ये विराटची मोठी मजल, फक्त सचिन आणि रोहितला जवलेली कामगिरी दाखवली करून
तो आला आणि विक्रम मोडून गेला! श्रेयसने 77 धावांची खेळी करताच सचिनचा ‘तो’ Record उद्ध्वस्त